लाडकी बहीण योजनेत बोगस लाभार्थींवर आळा घालण्यासाठी महिला व बालविकास विभागाने ई केवायसी बंधनकारक केले असून ई -केवायसीची मुदत 31 डिसेंबर पर्यंत वाढवण्यात आली आहे.
ALSO READ: महाराष्ट्र सरकारने सात नवीन पोलीस स्टेशन आणि अतिरिक्त वरिष्ठ पदांना मान्यता दिली
काही महिलांना ई -केवायसीची मुदत वाढवून देखील मोबाईल आधारशी संलग्न करणे किंवा ओटीपी न येणं अशा काही तांत्रिक अडचणींना सामोरी जावे लागत होते. आता महिलांचा हा त्रास दूर होणार असून आता संगणकीय प्रणालीत सुधारणा केल्यावर आता अंगणवाडी सेविका ई-केवायसीची जबाबदारी घेणार असून ई-केवायसी आता लाभार्थींच्या घरोघरी येऊन करणार आहे.
ज्या लाभार्थी महिलांचे ई-केवायसी झालेले नाही, अशा लाभार्थी महिलांच्या घरी जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा करून ई-केवायसी करण्याची जबाबदारी अंगणसेविका पूर्ण करणार आहे. या मुळे लाभार्थींना लाभ मिळणार आहे.
या पूर्वी ई-केवायसी करण्याची मुदत 18 नोव्हेंबर होती. आता ती 31 डिसेम्बर करण्यात आली असून काही लाभार्थी महिलांचं ई-केवायसी पूर्ण झालेले नाही. त्यात काही तांत्रिक अडचण येत होत्या. आता त्यांना दिलासा मिळणार आहे.
ALSO READ: विधानसभेत १६ विधेयके मंजूर, हिवाळी अधिवेशन संपले, पुढील अधिवेशन मुंबईत होणार
या शिवाय ज्या लाभार्थी बहिणींचे वडील किंवा पती या जगात नाही त्यांच्यासाठी संकेतस्थळांमध्ये बदल केले आहे. अशा बहिणींना संबंधित मृत्यूचे दाखले अंगणवाडी सेविकांना द्यावे लागणार आहे. जेणे करून अंगणवाडी सेविका लाभार्थी महिलांची ई-केवायसी पूर्ण करतील.
तसेच या ई-केवायसी मध्ये चूक झाली असेल तर त्यांनी देखील पुन्हा ई-केवायसी करून आपली चूक दुरुस्त करू शकतात.
ALSO READ: नागपूरला १,५०५ कोटी रुपयांचे विकास प्रकल्प मिळाले; गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली फडणवीस उद्घाटन करणार
महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी आवाहन केले आहे की, 31 डिसेंबरपूर्वी चूक सुधारण्याची लाभार्थी बहिणींना एकमेव संधी आहे. त्यांनतर ई-केवायसी मध्ये चूक झाल्यास सुधारणा करता येणार नाही. असा महिलांना योजनेतून बाद करण्याची शक्यता आहे.
Edited By - Priya Dixit