आळेफाटा, ता. १५ : वडगाव कांदळी (ता. जुन्नर) येथे शंभु महादेवाच्या यात्रोत्सवानिमित्त येथील शंभु महादेव प्रतिष्ठानच्या वतीने दोन दिवस आयोजित केलेल्या बैलगाड्यांच्या शर्यतीत पुणे, ठाणे, अहिल्यानगर, नाशिक व सातारा जिल्ह्यातील ३०० बैलगाड्यांना संधी देण्यात आली. या स्पर्धेत पहिल्या क्रमांकाची फळीफोड देवांश अक्षय पोखरकर व जाणकू काशिनाथ पानसरे यांचा बैलगाड्याने फोडली, तर द्वितीय क्रमांकांची फळीफोड मंगेश भगवान मुळे व तबाजी दत्तात्रय काळे यांच्या बैलगाड्याने फोडली, तसेच फायनलमध्ये प्रथम क्रमांकात अनुप नामदेव काळे व पाटीलबुवा बाळाजी दाभाडे यांचे बैलगाडे आले. या ठिकाणी प्रथम क्रमांकात ५५, तर द्वितीय क्रमांकात १४० बैलगाडे धावले. घाटाचा राजा ठरलेला पांडुरंग काळे यांच्या बैलगाड्यास एक बुलेट मोटार सायकल बक्षीस देण्यात आले.
प्रथम क्रमांकासाठी १ लाख ११ हजार१११ रुपयांचे बक्षीस, तर फळीफोड गाड्यांसाठी १५ हजार व चषक देण्यात आला, तर द्वितीय क्रमांकासाठी १ लाख १ हजार रुपयांचे बक्षीस व फळीफोड गाड्यांसाठी १० हजार रुपये बक्षीस देण्यात आले. घाटाचा राजासाठी एक नंबर फायनलसाठी ८१ हजार रुपये, दोन नंबर फायनलसाठी ६१ हजार, तीन नंबर फायनलसाठी ४१ हजार, चार नंबर फायनलसाठी ३१ हजार, पाच नंबर फायनलसाठी २१ हजार, सहा नंबर फायनलसाठी १५ हजार व सात नंबर फायनलसाठी ११ हजार, आठ नंबर फायनलसाठी १० हजार व नऊ नंबर फायनलसाठी १० हजार व दहा नंबर फायनलसाठी १० हजार रुपयांचे बक्षीस देण्यात आले.
या यात्रोत्सवाला माजी आमदार अतुल बेनके, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष पांडुरंग पवार, माउली खंडागळे, बाजार समितीचे उपसभापती निवृत्ती काळे, नबाजी घाडगे, वैभव तांबे, संभाजी चव्हाण, सरपंच उल्का पाचपुते, उपसरपंच संजय खेडकर आदी मान्यवरांनी भेटी दिल्या, अशी माहिती माजी सरपंच रामदास पवार यांनी दिली.