बीसीसीआयचा दिग्गज खेळाडूंना दणका, फक्त एकाच खेळाडूला मिळाली सूट; झालं असं की…
Tv9 Marathi December 15, 2025 11:45 PM

बीसीसीआयने गेल्या काही वर्षात देशांतर्गत क्रिकेटला चालना देण्यासाठी पावलं उचलली आहेत. यासाठी राष्ट्रीय संघात खेळणाऱ्या खेळाडूंना देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडू मागच्या काही वर्षात देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसत आहेत. आता विजय हजारे ट्रॉफी 24 डिसेंबर 2025 पासून 18 जानेवारी 2026 पर्यंत असणार आहे. या स्पर्धेत सर्व दिग्गज खेळाडूंना कमीत कमी दोन सामने खेळण्याचे आदेश दिले आहे. पण एका खेळाडूला सूट दिली आहे. हा खेळाडू विजय हजारे ट्रॉफीत भाग घेणार नाही. विराट कोहली, रोहित शर्मा, शुबमन गिल, जसप्रीत बुमराह, केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव आपआपल्या राज्यातील संघातून खेळण्यासाठी उतरतील. विराट कोहलीनेही सामने खेळणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. पण श्रेयस अय्यरला सूट दिली आहे. श्रेयस अय्यर ऑस्ट्रेलिया दौऱ्यात गंभीररित्या जखमी झाला होता. त्यामुळे त्याला थेट रुग्णालयात भरती केलं होतं. अजूनही श्रेयस अय्यर दुखापतीतून सावरत आहे. त्यामुळे बीसीसीआयने त्याला आराम दिला आहे.

भारत दक्षिण अफ्रिका टी20 मालिकेदरम्यान बीसीसीआयने खेळाडूंना खेळण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे वनडे आणि टी20 संघात निवडलेल्या खेळाडूंना कोणत्याही परिस्थितीत या स्पर्धेत खेळणार आहेत. कारण दक्षिण अफ्रिकेनंतर भारतीय संघ न्यूझीलंडविरुद्ध वनडे मालिका खेळणार आहे. ही मालिका 11 जानेवारीपासून आहे. त्यामुळे भारताच्या दिग्गज खेळाडूंकडे 18 दिवसांचा अवधी आहे. या 18 दिवसात दिग्गज खेळाडूंना कोणतेही दोन सामने खेळणं बंधनकारक असणार आहे.

बीसीसीआयच्या मते, या ब्रेकदरम्यान खेळाडून देशांतर्गत संघासोबत तालमेल बसवून आपला फॉर्म कायम करू शकतात. सीसीआयचे एक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितलं की, ’24 डिसेंबरपासून न्यूझीलंड वनडे मालिकेपर्यंत विजय हजारे ट्रॉफीचे सहा फेऱ्या होतील. यात खेळाडू आणि त्याच्या राज्यांच्या संघावर अवलंबून आहे कि कोणत्या दोन सामन्यात खेळतील.’ दक्षिण अफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी20 सामन्यानंतर खेळाडूंना स्पष्टपणे सांगण्यात आले की, विजय हजारे ट्रॉफीमध्ये खेळणे पर्यायी नाही. म्हणजेच खेळाडूंना प्रत्येकी किमान दोन सामने खेळावे लागतील.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.