लियोनल मेस्सी दुसऱ्यांदा भारत दौऱ्यावर आला आहे. यावेळी त्याची एक झलक पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींची झुंबड उडाली आहे. तीन दिवसांच्या दौऱ्याची दिल्लीत सांगता होत आहे. शेवटच्या दिवशी दिल्लीतील अरूण जेटली मैदानात त्याचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. (PHOTO CREDIT- PTI)
दिल्लीच्या अरूण जेटली मैदानात त्याच्या सन्मानार्थ एका कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यावेळी मैदान त्याच्या चाहत्यांनी खचाखच भरलं होतं. यावेळी आयसीसीचे प्रमुख जय शाह यांनी हजेरी लावली. तसेच मेस्सीला काही खास गिफ्ट दिले. यात टी20 वर्ल्डकपच आमंत्रण दिलं गेलं. यात भारत युएसएचं तिकीट आहे. (PHOTO CREDIT- PTI)
जय शाह यांनी मेस्सी टीम इंडियाची जर्सी नंबर 10 गिफ्ट दिली. यासह एक क्रिकेटची बॅट दिली. यावर सर्व दिग्गज क्रिकेटपटूंचे ऑटोग्राफ आहेत. या कार्यक्रमात मेस्सीने युवा फुटबॉल खेळाडूंना काही टिप्स दिल्या. (PHOTO CREDIT- PTI)
लियोनल मेस्सीने या कार्यक्रमात सांगितलं की, “भारतातल्या प्रेम आणि आपुलकीबद्दल मी सर्वांचे आभार मानू इच्छितो. आमच्यासाठी हा खरोखरच एक सुंदर अनुभव होता. आम्ही नक्कीच परत येऊ, आशा आहे की एक दिवस सामना खेळण्यासाठी किंवा इतर कोणत्याही प्रसंगी, पण आम्ही नक्कीच भारताला भेट देण्यासाठी परत येऊ. खूप खूप धन्यवाद.” (PHOTO CREDIT- PTI)
लियोनल मेस्सीचा ‘GOAT इंडिया टूर 2025’ हा दौरा कोलकाता येथे सुरू झाला. त्यानंतर हैदराबादला गेला. दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी तो मुंबईला आला आणि आता तिसऱ्या दिवशी दिल्लीत आहे. हा त्याच्या दौऱ्याचा शेवटचा टप्पा आहे. यानंतर मेस्सी मायदेशी परतणार आहे. मेस्सी आता फीफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत खेळताना दिसेल. (PHOTO CREDIT- PTI)