इचलकरंजी : इचलकरंजी महापालिकेसाठी निवडणूक झाल्यामुळे राजकीय घडामोडींनी वेग आला आहे. भाजप आणि महाविकास आघाडीतर्फे प्रभागनिहाय इच्छुकांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली. त्यामुळे भाजप आणि काँग्रेस भवन कार्यालयात इच्छुकांची वर्दळ दिसून आली.
दोन्हीकडे वरिष्ठ नेतेमंडळींनी इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. यामध्ये निवडणूक लढवण्यासाठी तुम्ही का इच्छुक आहात, ते प्रभागातील तुमचे कार्य काय आणि पक्षासाठी दिलेले योगदान किती, अशा अनेक बाबींची माहिती इच्छुकांकडून घेण्यात आली. आणखी दोन दिवस मुलाखतीची प्रक्रिया चालणार आहे.
PMC Election : वाढलेल्या इच्छुकांमुळे नेत्यांचा लागणार कस; भाजपकडून उमेदवारीसाठी नेमके काय निकष लावले जाणार, याकडे अनेकांचे लक्षत्यामुळे महापालिका निवडणूक कधी लागणार, याची इच्छुकांना धाकधूक लागली होती. अधून - मधून निवडणूक पुढे जाण्याच्या चर्चेमुळे त्यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली होती. अखेर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर राजकीय पक्षही अलर्ट मोडवर आले आहेत. निवडणूक प्रक्रियेत पहिल्या टप्प्यात उमेदवार निश्चित करावे लागणार आहेत.
त्यानंतरच उमेदवारांना आपल्या प्रभागात अधिक प्रभावीपणे प्रचार करणे सोयीचे होणार आहे. या पार्श्वभूमीवर भाजप आणि महाविकास आघाडीने इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यास सुरुवात केली आहे.
Jalgaon Municipal Election : शिंदे गटाच्या मुलाखतीत ठाकरे गट अन् राष्ट्रवादीचे चेहरे; जळगाव महापालिकेत राजकीय खलबतं वाढलीभाजप कार्यालयात पक्षाचे संघटन मंत्री मकरंद देशपांडे, माजी आमदार प्रकाश आवाडे, प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर, आमदार राहुल आवाडे, जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक - निंबाळकर यांनी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या.
त्यामुळे भाजप कार्यालय आज दिवसभर गजबजले होते. रात्री उशिरापर्यंत मुलाखती घेण्यात येत होत्या. प्रभाग १ ते ८ पर्यंतच्या इच्छुकांच्या मुलाखती आज घेण्यात आल्या. अनेकांनी एकाच घरात दोन उमेदवारीची मागणी केली आहे. पक्ष कार्याचा लेखाजोखाही इच्छुकांनी मांडला. महाविकास आघाडीकडून ६० जणांच्या मुलाखती
महाविकास आघाडीने काँग्रेस कमिटीमध्ये इच्छुकांच्या मुलाखती घेतल्या. प्रभाग क्रमांक १ ते ५ मधील ६० इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. काँग्रेसचे प्रदेश सचिव शशांक बावचकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पक्षाचे मदन कारंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय कांबळे, शिवसेनेचे मलकारी लवटे, माकपचे भरमा कांबळे आदींनी या मुलाखती घेतल्या. पुढील तीन दिवस मुलाखती सुरू राहणार आहेत.