Traffic Disputes: उंब्रजची वाहतूक कोंडी सुटणार कधी?; सेवा रस्त्यावर रोजचीच कटकट, वाहनधारक त्रस्त, वादावादीचे प्रकार
esakal December 18, 2025 04:45 AM

उंब्रज : येथील सेवा रस्त्यावरील वाहतूक कोंडीने वाहनधारकांसह स्थानिक हैराण झाले आहेत. वाहतूक कोंडीची रोजचीच कटकट झाली असून, त्यामुळे सेवा रस्त्यावरून नागरिकांना कसरत करत प्रवास करावा लागत आहे. वाहनधारकांना वादावादीचे प्रकारांना सामना करावा लागत आहे. येथे पार्किंग सुविधेचा अभाव असल्याने ही वाहतूक कोंडी संपणार कधी? असा सवाल वाहनधारकांतून उपस्थित हाेत आहे. वाहतूक कोंडीतून जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असून, याकडे संबंधित विभाग लक्ष कधी देणार? असा संतप्त सवाल वाहनधारकांतून हाेत आहे.

MPSC Success Story : साताऱ्यातील कामगाराचा मुलगा बनला 'क्लास वन' अधिकारी; वैभवने हलाखीच्या परिस्थितीवर मात करत गाठले यशाचे शिखर !

उंब्रज हे बाजारपेठचे मोठे गाव असून, अनेक समस्यांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच वाहतूक कोंडीची भर होऊन बसली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणामुळे अनेक त्रुटी निर्माण झाल्या आहेत. यावेळी राष्ट्रीय महामार्गलगत असणारे सेवा रस्ते तयार करताना भविष्यात येणाऱ्या अडचणीकडे दुर्लक्ष केले झाले आहे. महामार्गालगत असणारे सेवा रस्ते अरुंद असल्याने सध्या वाहतूक कोंडीचा प्रश्न निर्माण झाला आहे.

येथे शाळा, कॉलेज, बॅंक, सरकारी कार्यालये, तसेच अनेक खासगी संस्था आहेत. यामुळे परिसरातील गावांतून येणाऱ्या नागरिकांची नेहमीच रहदारी सुरू असते. उंब्रजमधून पाटण- पंढरपूर राज्यमार्ग जात आहे. या मार्गावरून चिपळूण, रत्नागिरीकडे पर्यटनासाठी ये-जा करणााऱ्या वाहनांची रहदारी सुरू असते. ही रहदारी सेवा रस्त्यावरूनच होत आहे; परंतु सेवा रस्त्यालगत असणाऱ्या दुकानात खरेदीसाठी येणाऱ्यांची वाहनेही सेवा रस्त्यावरच लावलेली असतात, तर काही दुकानदार दिवसभर त्यांची वाह़ने सेवा रस्त्यावरच पार्किंग करत आहेत.

अरुंद सेवा रस्त्यावर वाहने उभी केल्याने मोठी व अवजड वाहने ये- जा करताना वाहतूक समस्या निर्माण होत आहे. यामुळे दुचाकीधारकांना जीव मुठीत धरून सर्कस करत मार्ग शोधावा लागत आहे. यामुळे सेवा रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्या वाहनधारंकाबरोबर वादाचे प्रकार घडत आहे. वाहनधारक व नागरिकांचा वाहतूक कोंडीमुळे वेळ वाया जात आहे. सेवा रस्त्यावर वाहने उभी करणाऱ्यांवर कारवाई करणे गरजेचे आहे. वाहतूक कोंडीची समस्या ही नेहमीचीच झाली असून, त्याकडे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, असे नागरिकांतून बोलले जात आहे.

थरारक घटना! 'कादवे डोंगरातील कड्यात परप्रांतीय युवक रात्रभर जाेरजाेरत ओरडला, आवाज कुणीच ऐकला नाही, सकाळ झाली अन्.. तर डाेकेदुखी ठरणार..

भविष्यात सेगमेंट पुलाचे काम करताना सेवा रस्त्यावरून राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात येणार आहे. सध्याच्या सेवारस्त्यांची दुरवस्था व ढिसाळ नियोजन पाहता भविष्यात सेवा रस्ते रुंदीकरण करणे गरजेचे आहे. अन्यथा परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडीची समस्या डोकेदुखी ठरणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.