पैठण : येथील नगर पलिकेच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये निवडणूकीसाठी उभे असलेल्या एका उमेदवाराच्या घरा समोर जादुटोणा केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. नगर पालिका निवडणुकीसाठी मंगल कल्याण मगरे ह्या उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे प्रभाग क्रमांक तीन मधुन निवडणूक लढवित आहे.
या महिला उमेदवारांच्या घरासमोर मगरे यांच्या घरासमोरील गॅलरीत अज्ञात व्यक्तीने दुरडीमध्ये उमेदवार मंगल मगरे व त्यांचे पती कल्याण मगरे यांचे फोटो असलेली काळ्या रंगाची बाहुली ठेवण्यात आली आहे. त्या बाहुलीला सुया टोचलेल्या होत्या. तसेच लिंबू, हळद-कुंकू, हिरव्या रंगाचे कापड,नारळ, नकली जोडवे आदी साहित्य ठेवण्यात आले आहे. दरम्यान असाच प्रकार प्रभाग क्रमांक ७ मध्येही घडल्याचे समोर आले आहे. तेथे दुरडीमध्ये उबाठा गटाच्या २५ उमेदवारांचे फोटो असलेली प्रचार पत्रके, त्यावर तांदूळ व पेटवलेला दिवा ठेवून आघोरी प्रकार उघडकीस आला आहे. दरम्यान, हा अघोरी प्रकार विरोधकांनी केला आहे.असा आरोप ठाकरे सेनेचे उप जिल्हा प्रमुख दत्ता गोर्डे यांनी केला आहे.
आळंदीत पदयात्रांनी वातावरण निवडणूकमयनिवडणुकीमुळे चर्चेला आले उधाण
दरम्यान, सध्या शहरातील तीन प्रभागात निवडणुकीचा प्रचार उमेदवारांकडुन सुरु आहे.तर नगर पालिका निवडणुकीचा निकाल ही तीन दिवस येवुन ठेपला आहे.या पार्श्वभूमीवर जादुटोणाचा हा अघोरी प्रकार घडल्याने पैठण शहरात चर्चेला उधाण आले आहे.