पुणेकरांचा प्रवास होणार गारेगार; इलेक्ट्रिक डबल डेकर बस लवकरच सेवेत, कोणत्या मार्गांवर धावणार जाणून घ्या
Saam TV December 19, 2025 07:45 AM

पुणेकरांसाठी एक आनंदाची आणि महत्वाची बातमी. पुणे महानगर परिवहन महामंडळ भाडेतत्त्वावर २५ इलेक्ट्रिक डबल डेकर बस घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी पीएमपी प्रशासनाने बुधवारी निविदा काढली असून, नव्या वर्षात पुण्याच्या रस्त्यांवर या डबल डेकर बस धावताना दिसणार आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पीएमपी प्रशासनाने सप्टेंबर महिन्यात इलेक्ट्रिक डबल डेकर बसची प्रायोगिक चाचणी घेतली होती. त्या अनुषंगाने हिंजवडी, भोसरी, कोरेगाव पार्क आणि विमाननगर परिसरातील रस्त्यांवर दहा दिवस चाचणी राबवण्यात आली होती. ही डबल डेकर बसची चाचणी यशस्वीरित्या पार पडली.

'पंचविशीत २-३ बीएचके फ्लॅट अन्... मुलीच्या कुटुंबाकडून भरमसाठ अपेक्षा चुकीचं', मराठी अभिनेत्रीचं लग्नाबाबत परखड मत

ही डबल डेकर बस पूर्णत: इलेक्ट्रिक असल्याची माहिती आहे. डबल डेकरच्या बॅटरी कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यासाठी पीएमपीने तीन सदस्यांची समिती नेमली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर इलेक्ट्रिक डबल डेकर बस घेणे योग्य असल्याचे मत नोंदवण्यात आले आहे. त्यानुसार, आता २५ इलेक्ट्रिक डबल डेकर बस घेण्याचा निर्णय पीएमपी प्रशासनाने घेतला आहे.

'१९ डिसेंबरला नागपूरची व्यक्ती पंतप्रधान होणार'; माजी मुख्यमंत्र्यांचा दावा, कारणही सांगितलं...

ही डबल डेकर बस पूर्णत: वातानुकूलित तसेच प्रदूषणमुक्त असणार आहे. यातून प्रवाशांना आरामदायी प्रवासाची सुविधा मिळणार आहे. प्राथमिक माहितीनुसार, सुरूवातीच्या टप्प्यात हिंजवडी फेज - ३ ते हिंजवडी फेज - ३वर्तुळ, रामवाडी मेट्रो स्टेशन ते खराडी, मगरपट्टा सिटी ते कल्याणी नगर मेट्रो स्टेशनस पुणे स्टेशन ते लोहगाव विमानतळ, देहू ते आळंदी तसेच हिंजवडी ते मार्गांवर ई डबल डेकर बस धावणार आहेत. या डबल डेकर बसचा फायदा नक्कीच प्रवाशांना होईल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.