Pakistani Beggars : पाकिस्तानात भीक मागण्याची मिळते खास ट्रेनिंग, दरवर्षी 42 अब्ज डॉलर्सचा व्यवसाय, सौदीने 56 हजार पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकललं
GH News December 19, 2025 03:11 PM

Pakistani Beggars : पाकिस्तान कायम कोणत्या न कोणत्या वादग्रस्त कारणामुळे चर्चेत असणारा देश आहे. आता देखील पाकिस्तानबद्दल मोठी माहिती समोर येत आहे. जगातील सर्वात जास्त भिखारी पाकिस्तानात असल्याची माहिती समोर आली आहे. एवढंच नाही तर, सौदीने 56 हजार पाकिस्तानी भिखाऱ्यांना हाकललं देखील आहे. रिपोर्टनुसार, इस्लाम धर्मातील पवित्र स्थळ सौदी अरब येथे पाकिस्तानी भिखाऱ्यांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. हे लोक उमराह किंवा व्हिजिट व्हिसावर सौदीला पोहोचायचे आणि मक्का आणि मदीनासारख्या पवित्र स्थळांबाहेर भीक मागून यात्रेकरूंना त्रास द्यायचे.

पाकिस्तानी लोकांची भीक मागण्याची समस्य फक्त सौदीपर्यंत मर्यादित नाही… संयुक्त अरब अमिरातीने (UAE) पाकिस्तानी नागरिकांवर व्हिसा निर्बंध लादले आहेत, कारण बरेच लोक तिथे जाऊन गुन्हेगारीमध्ये सामील होत आहेत आणि संघटित टोळ्यांसोबत भीक मागत आहेत. पश्चिम आशियाई देशांमध्ये पकडल्या जाणाऱ्या 90 टक्के भिकारी पाकिस्तानी असल्याचं उघड झालं आहे.

पाकिस्तानात भीक मागण्याची मिळते खास ट्रेनिंग

गेल्या अनेक वर्षांपासून पाकिस्तानात भीक मागण्याचा व्यवसाय फोफावला आहे… जगातील सर्वात जास्त भिकारी पाकिस्तानातील आहेत. येथे भिकारी दरवर्षी भीक मागून सुमारे 42 अब्ज डॉलर्स रुपयांची ममाई करतात. पाकिस्तानी न्यूज वेबसाईट DAWN च्या खास रिपोर्टनुसार, ‘2024 मध्ये पाकिस्तानमध्ये अंदाजे 38 दशलक्ष भिकारी होते. पाकिस्तानमध्ये भीक मागण्यासाठी खास ट्रेनिंग देखील दिले जाते.’

पाकिस्तानी भिकाऱ्याची कमाई

पाकिस्ताना भिकारी रोज जवळपास 32 अरब पाकिस्तानी रुपयांची कमाई करतो… ही रक्कम छोटी नाही… पाकिस्तानी भिकारी लोकांचं लक्ष वेधून घेण्याचा आणि त्यांना भावनिकदृष्ट्या प्रेरित करण्याचा प्रयत्न करतात. कराचीमध्ये, एक भिकारी दररोज सरासरी 2 हजार पाकिस्तानी रुपये कमवतो. लाहोरमध्ये 1 हजार 400 रुपये. तर इस्लामाबादमध्ये 950 रुपये एक भिकारी दिवसाला कमावतो… ही फार मोठी गोष्ट आहे.

परदेशात भिकाऱ्यांचं रॅकेट

पाकिस्तानी भिकाऱ्यांना खास ट्रेनिंग दिली जाते. त्यांच्याकडे मार्केटिं स्किल असते… परदेशात पकडले जाणारे जवळजवळ 90 टक्के भिकारी पाकिस्तानी वंशाचे आहेत. ते मक्का आणि मदिना येथे जाण्यासाठी व्हिसा मिळवतात आणि नंतर सौदी अरेबियात भीक मागतात. पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी स्वतः कबूल केलं होतं की, भिकारी जगात पाकिस्तानची बदनामी करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.