swt1811.jpg
11547
पाटः डॉ. विलासराव देसाई महाविद्यालयात महाविद्यालयीन डेज साजरे करण्यात आले.
पाट महाविद्यालयामध्ये
सांस्कृतिक दिन उत्साहात
सकाळ वृत्तसेवा
म्हापण, ता. १८ः पाट येथील डॉ. विलासराव देसाई महाविद्यालयात विविध महाविद्यालयीन डेज साजरे करण्यात आले. फनी गेम्सने कार्यक्रमाला चांगलीच रंगत आणली. विद्यार्थ्यांनी टी-शर्ट डे, कॅप डे, साडी डे, फॉर्मल डे, ट्रॅडिशनल डे, चॉकलेट डे, थीम डे, गॉगल डे, ब्लॅक अँड व्हाईट डे, फनी गेम्समधून आपल्या कलागुणांची चुणूक दाखवली.
महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी यांनी यासाठी मेहनत घेतली. विद्यार्थ्यांनी ग्रुप फोटो, सेल्फीचा आनंद घेतला. ट्रॅडिशनल डे दिवशी आपल्या भारतीय संस्कृतीतील पारंपरिक वेशभूषा सादर करण्यात आल्या. गॉगल डेला मुलांनी आकर्षक आणि उत्कृष्ट सनग्लासेस वापरलेले गॉगल लावून तरुणाईचा स्टायलिशपणा दाखवून दिला. फनी गेम्सने या उपक्रमाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. विविध खेळांचा विद्यार्थ्यांनी आनंद लुटला. टाळांच्या कडकडाटात खेळांना दाद मिळत होती. प्लास्टिक बॉलच्या सहाह्याने काही अंतरावर ठेवलेल्या रिकामी खोक्यात एक टप्पा पार करून तो चेंडू आत गेल्यास त्यासाठी विशेष बक्षीसही ठेवण्यात आले होते. असे एकापेक्षा एक गेम्समधून विद्यार्थ्यांनी या उपक्रमाचा आनंद लुटला.