ध्यानधारणा उपक्रम रविवारी ऑनलाइन
सकाळ वृत्तसेवा
रत्नागिरी, ता. १८ : जागतिक ध्यानधारणा दिनानिमित्त येत्या रविवारी (ता. २१) रात्री ८ वाजता ऑनलाइन माध्यमातून संपूर्ण जगभरातील लाखो लोक एकाच वेळी एकत्र ध्यान करणार आहेत. एक विश्व- एक हृदय या घोषवाक्याखाली हा उपक्रम राबविण्यात येत असून त्यात भाग घेण्याचे आवाहन केले आहे. हार्टफुलनेस संस्थेचे आध्यात्मिक मार्गदर्शक व पद्मभूषण पू. डॉ. कमलेश पटेल उर्फ दाजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे ध्यान सत्र होणार आहे.
समाजात मानसिक आरोग्य, मनःशांती, नैतिक मूल्ये, आणि जागतिक ऐक्य वाढविण्याचा त्यामागे हेतू आहे. ध्यानात नवीन असलेले आणि अनेक वर्षे साधना करणारे सर्व जण या सत्रात सहभागी होऊ शकतात. सहभागी व्यक्तींना निःशुल्क नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. हा उपक्रम १६० पेक्षा जास्त देशांमध्ये साजरा केला जात आहे. विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि सर्वसामान्य नागरिकांनी यात मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, असे आवाहन हार्टफुलनेस ध्यान प्रशिक्षक प्रा. डॉ. सुधीर आकोजवार यांनी केले आहे. सर्वाधिक विद्यार्थी नोंदणी करणाऱ्या शैक्षणिक संस्थांना विशेष सन्मान देण्यात येणार आहे. यासाठी नोंदणी सर्व भाषांमध्ये उपलब्ध असून मोफत आहे. मराठीमध्ये नोंदणी करण्यासाठी: https://meditationday.global/mr/ यावर क्लिक करा, असे आवाहन केले आहे.