सिन्नर: नाशिक-पुणे रेल्वेमार्ग बदलामागे स्वार्थी राजकारण असून, विशिष्ट घटकांच्या फायद्यासाठी मार्ग बदलण्यात आल्याचा आरोप सर्वपक्षीय सहविचार सभेत करण्यात आला. हा मार्ग जुन्या मार्गाने होण्यासाठी व्यापक स्वरूपाचे आंदोलन उभारण्याचा निर्णय या वेळी घेण्यात आला. दरम्यान, रेल्वेमार्ग होण्यासाठी तहसील विभागाला निवेदन देण्यात आले.
येथील शासकीय विश्रामगृहात पार पडलेल्या सहविचार सभेस बाजार समितीचे सभापती श्रीकृष्ण घुमरे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले, ‘सिमा’चे सचिव बबन वाजे, विश्वस्त रतन पडवळ, राजाराम मुरकुटे, हरिभाऊ तांबे, उद्योजक विठ्ठल जपे, अतुल अग्रवाल, कमलाकर पोटे, अरुण चव्हाणके, दिगंबर देशमुख, रघुनाथ बरकले, सविता कोठूरकर, भाऊसाहेब शिंदे, गौरव घरटे, सजन सांगळे, बाळासाहेब हांडे, दत्ता वायचळे, राजाराम मुंगसे आदींसह नागरिक उपस्थित होते.
आंदोलनाची दिशा उद्या ठरणार
रेल्वेमार्ग होण्यासाठी सिन्नरकरांनी आक्रमक भूमिका घेतली असून, व्यापक स्वरूपाचे आंदोलन उभारण्यावर शिक्कामोर्तब सहविचार सभेत करण्यात आले. आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी शुक्रवारी (ता. १९) दुपारी चारला मातोश्री नर्मदा लॉन्स येथे मेळावा घेण्याचे ठरविण्यात आले.
तहसीलदारांना निवेदन
सिन्नरहून रेल्वेमार्ग होण्यासाठी येथील जनभावना विचारात घ्यावी. त्यामुळे हा मार्ग जुन्या सर्वेक्षणानुसार सिन्नरहून करण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार सुरेंद्र देशमुख यांच्याकडे करण्यात आली. त्यात तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.
युवकांसाठी फायदा
पुण्यातील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या युवक-युवतींना प्रवासाची सोय.
कमी वेळात, सुरक्षित व किफायतशीर प्रवास शक्य.
प्रमुख मागण्या
जुन्या सर्वेक्षणानुसार नाशिक-पुणे रेल्वेमार्ग सिन्नर-संगमनेरमार्गेच करावा.
सिन्नर व संगमनेर तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी रेल्वेमार्ग मंजूर करावा.
फलटण शहराला बिहार होण्यापासून वाचवा : रामराजे नाईक-निंबाळकर; अशी प्रवृत्ती हद्दपार करण्यासाठी नेमकं काय म्हणाले?सहविचार सभेतील मुद्दे
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग : सिन्नर-संगमनेर मार्गाची मागणी.
नाशिक-पुणे रेल्वेमार्ग मूळतः सिन्नर-संगमनेरमार्गे प्रस्तावित होता.
त्या अनुषंगाने अधिसूचना काढून जमिनींचे संपादनही करण्यात आले.
सध्या हा रेल्वेमार्ग पुणतांबा-शिर्डीमार्गे वळविण्यात आला आहे.
पुणतांबा–शिर्डी मार्ग झाल्यास सिन्नर व संगमनेर तालुक्यांना कोणताही थेट लाभ नाही.