ICICI Prudential AMC IPO GMP : भारतीय शेअर बाजारात उद्या म्हणजेच शुक्रवार, 19 डिसेंबर 2025 ला वर्षातील चौथा सर्वात मोठा ICICI Prudential Asset Management Company चा IPO लिस्ट होणार आहे. या IPO साठी १२ ते १६ डिसेंबरपर्यंत गुंतवणूकदारांनी बोली लावली होती. आणि आता सर्वांचे लक्ष या शेअर्सच्या लिस्टिंगकडे लागले आहे. हा IPO पूर्णपणे 'ऑफर फॉर सेल' होता आणि त्यात एकूण 10,602.65 कोटी रुपयांचे शेअर्स विक्री करण्यात आली आहे.
IPO ला जबरदस्त प्रतिसादICICI Prudential Asset Management Company च्या IPO ला एकूण 39.17 पट सब्सक्रिप्शन मिळाले.
मोठे संस्थात्मक गुंतवणूकदार (QIB) कॅटेगरीत तब्बल 123.67 पट सब्सक्रिप्शन झाले
हाय-नेटवर्थ गुंतवणूकदार (NII) कॅटेगरीत 22.04 पट मागणी नोंदवली गेली
तर रिटेल गुंतवणूकदारांनी 2.53 पट शेअर्ससाठी बोली लावली होती.
शेअर बाजारात कंपनीने IPO अंतर्गत 3.50 कोटी शेअर्स विक्रीसाठी आणले होते, मात्र बाजारात तब्बल 137.15 कोटी शेअर्ससाठी बोली लागली होती. त्यामुळे या IPO ला बाजारात जबरदस्त प्रसाद मिळालेला दिसत आहे.
Share Market IPO : गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी! या आठवड्यात येत आहेत 4 नवे IPO; कोणते आणि कधी ते जाणून घ्या! GMP कसा आहे?ICICI Prudential AMC चा ग्रे मार्केट प्रीमियम (GMP) सध्या मजबूत आहे. बाजारातील माहितीनुसार, हा शेअर सध्या ग्रे मार्केटमध्ये ₹375 ते ₹385 च्या प्रीमियमवर ट्रेड होत आहे. यावरून शेअर्सची लिस्टिंग ₹2,165 च्या इश्यू प्राइसपेक्षा ₹370 ने वाढून ₹2535 वर होण्याची शक्यता आहे. म्हणजेच गुंतवणूकदारांना इश्यू प्राइसपेक्षा सुमारे 18% नफा मिळू शकतो.
Ambani gifts Lionel Messi : अनंत अंबानींकडून मेस्सीला 11 कोटींचं घड्याळ भेट! एवढं महाग का आहे Richard Mille घडयाळ? काय आहे खास?शेअर बाजारात लिस्टिंगनंतर ICICI Prudential AMC ही ICICI समूहाची पाचवी लिस्टेड कंपनी ठरेल. यापूर्वी ICICI Bank, ICICI Prudential Life Insurance, ICICI Lombard General Insurance आणि ICICI Securities या कंपन्या आधीच शेअर बाजारात लिस्ट झाल्या आहेत.