Experience Celebrity-Style Interaction with Premanand Maharaj: क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा अलीकडेच वृंदावनमध्ये गुरु प्रेमानंद महाराज यांचे आशीर्वाद घेण्यासाठी गेले. त्यांच्या भेटीचा अनुभव आणि यामध्ये येणार खर्च जाणून घेण्यासाठी अनेक चाहत्यांमध्ये उत्सुकता होती.
व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले आहेत. या भेटीत विराट आणि अनुष्का श्रेद्धेने हात जोडून प्रवचन ऐकत आणि आनंदी दिसले. अनुष्का मरून काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसली, तर विराट ब्राउन हुडी आणि काळे ट्राउझर घालून पुढच्या ओळीत बसला होता. दोघेही महाराजांचे प्रवचन लक्षपूर्वक ऐकत होते आणि चेहऱ्यावर शांतात आणि समाधान स्पष्ट दिसते होते.
Morning Breakfast Recipe: गुरुवारी सकाळी नाश्त्याला बनवा मऊ लुसलुशीत तुपातील शिरा, लगेच लिहून घ्या रेसिपी प्रेमानंद महाराज कुठे राहतात?प्रेमानंद महाराज वृदांवनच्या परिक्रमा मार्गावरील श्री हित राधा केली कुंज आश्रममध्ये वास्तव्य करतात. हे आश्रम शांतता आणि आध्यात्मिक ऊर्जा यासाठी प्रसिद्ध आहे. येथे भक्त दर्शन, सत्संग आणि वैयक्तिक मार्गदर्शनासाठी येतात.
सुविधामहाराजांना भेट देण्यासाठी नियोजन करणे गरजेचे आहे. सध्या ऑनलाइन बुकिंगची सुविधा उपलब्ध नाही. भाविकांना आश्रमात येऊन टोकन घेणे आवश्यक आहे, जे सहसा सकाळी ९:३० वाजता उपलब्ध असतात आणि दुसऱ्या दिवशी दर्शनासाठी वैध असतात. टोकनसाठी आधार कार्ड आवश्यक आहे.
याशिवाय, वैयक्तिक मार्गदर्शन किंवा एकांत चर्चेसाठी संधी मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे. दर्शनाची संधी भक्तांची संख्या आणि महाराजांची दिनचर्या यावर अवलंबून असते.
खर्च किती येतो?प्रेमानंद महाराजांचे दर्शन पूर्णपणे मोफत आहे. तथापि, काही भक्त प्रवास, सोबती किंवा अतिरिक्त झोपण्याच्या सुविधांवर थोडे पैसे खर्च करतात. आश्रमाशी त्याचा थेट संबंध नाही आणि त्याचा खर्च पूर्णपणे एखाद्याच्या निवडीवर अवलंबून असतो.
आश्रमाचे वेळापत्रकआश्रमात पहाटे ४:१० वाजता सत्संग सुरू होतो आणि दिवसभर भजन, आरती आणि भक्ती कार्यक्रम सुरू राहतात. येथे येणाऱ्या भाविकांना वेळापत्रकाचे पालन करण्याचा आणि आवश्यक कागदपत्रे सोबत बाळगण्याचा सल्ला देण्यात येतो.
Germany Jobs: ‘मेड इन महाराष्ट्र’ मनुष्यबळाला जर्मनीचे दरवाजे बंद? १० हजार तरुणांचे भविष्य टांगणीला हे आश्रम का खास आहे?श्री हित राधा केली कुंज आश्रम भक्तांना शांती, संतुलन आणि आध्यात्मिक अनुभव देतो. प्रेमानंद महाराजांच्या शिकवणी जीवनात स्थिरता आणि भक्तीचा मार्ग प्रदान करतात. यामुळे, विराट कोहली, अनुष्का शर्मा आणि भारत आणि परदेशातील अनेक लोक आध्यात्मिक मार्गदर्शन आणि शांती मिळविण्यासाठी येथे येतात.