Kartik Aaryan’s Question Steals the Show on KBC: 'कोण बनेगा करोडपती'चा शो गेल्या अनेक वर्षापासून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे. या शोला बिग बी अमिताभ बच्चन होस्ट करतात. दरम्यान या शोमध्ये सिनेमाच्या प्रमोशनसाठी अनेक सेलिब्रिटी येत असतात. अशातच 'तु मेरा मैं तेरा मै तेरा तू मेरी' या सिनेमाच्या प्रमोशनसाठी अभिनेता कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री अन्यना पांडे आले होते. यावेळी ते हॉट सीटवर बसलेले पहायला मिळाले.
सोनी टीव्हीने त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर केबीसीचा एक प्रोमो शेअर केलाय. या प्रोमोमध्ये कार्तिक आर्यन आणि अभिनेत्री अनन्या पांडे हॉट सीटवर बसलेले पहायला मिळताय. यावेळी दोघेही बिग बींना त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारताना पहायला मिळताय. यावेळी कार्तिक आर्यनने बिग बींना विचारलं की, 'जयाजींना तुमच्या फोनचा पासवर्ड माहिती आहे का?' हा प्रश्न ऐकताच अमिताभ बच्चन यांना हसू अनावर झालं आणि ते गमतीत म्हणाले, 'मी त्यांना पासवर्ड सांगेल? तु काय वेडा आहेस का?' त्यांच्या या उत्तरानंतर शोच्या सेटवर एकच हशा पिकला.
दरम्यान या उत्तरावर न थांबताच कार्तिकने त्यांना दुसरा प्रश्न विचारला, 'तुम्ही जयाजींना लपून काही खाता काय़?' या प्रश्नावरही बिग बी खूप हसले. यावेळी अनन्या पांडेनं सुद्धा अमिताभ यांना अनेक प्रश्न विचारले.अमिताभ बच्चनयांना अनन्याने 'OOTD', 'No cap' सारख्या शब्दाचा अर्थ समजावला. तसंच Drip चा अर्थ समजताच बिग बी खूप हसले.
View this post on Instagram
यावेळी शोमध्ये कार्तिकने अमिताभ यांना कोरियन दिल बनवायला शिकलं. दरम्यान कार्तिक आणि अनन्या यांचा 'तू मेरी मै तेरा मै तेरा तू मेरी' हा सिनेमा २५ डिसेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं सध्या जोरदार प्रमोशन सुरु आहे.
'नितीश कुमारजी तुमचं धोतर खेचलं तर...' बुरखा खेचण्यावरुन राखी सावंत भडकली, जाहीर माफीची केली मागणी