आयपीएल मिनी लिलावात 350हून अधिक खेळाडूंची नावं होती. यापैकी फक्त 77 खेळाडूंना भाव मिळाला. न विकलेल्या खेळाडूंमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा माजी स्टार सलामीवीर डेवॉन कॉनवे याचंही नाव होतं. डेवॉन कॉनवेने आयपीएल 2026 च्या लिलावात 2 कोटी बेस प्राईससह उतरला होता. आता वेस्ट इंडिजविरुद्धच्या कसोटी सामन्यात द्विशतकी खेळी करून फॉर्मात असल्याचं दाखवून दिलं आहे. (Photo- BLACKCAPS Twitter)
मिनी लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्सने त्याला रिलीज केलं होतं. त्याला पुन्हा संघात घेतील अशी अपेक्षा होती. पण फ्रेंचयाझींनी युवा खेळाडूंवर जास्त विश्वास टाकला. डेवॉन कॉनवेने 29 आयपीएल सामने खेळले आहेत. 11 अर्धशतकांसह 1080 धावा केल्या आहेत. त्याचा सर्वोच्च धावसंख्या ही नाबाद 92 धावांची खेळी आहे. (Photo- BLACKCAPS Twitter)
डेवॉन कॉनवेने त्याच्या कसोटी पदार्पणात द्विशतक झळकावल्यानंतर पहिल्यांदाच द्विशतक झळकावले. त्याने त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरे द्विशतक झळकावले आहे.डेवॉन कॉनवेने 318 चेंडूत 28 चौकारांसह दुसरे कसोटी द्विशतक पूर्ण केले. कॉनवेने यापूर्वी 2021 मध्ये इंग्लंडविरुद्ध पदार्पणात पूर्ण 200 धावा केल्या होत्या. (Photo- BLACKCAPS Twitter)