शिवसेना शिंदे गट आणि भाजप बीएमसी निवडणूक 2025 मुंबई: मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC Election 2025) पार्श्वभूमिवर शिवसेना शिंदे गट (Shivsena Shinde Group) आणि भाजपामध्ये (BJP) जागा वाटपावरून जोरदार रस्सीखेच सुरू आहे. 18 डिसेंबर झालेल्या भाजपा आणि शिवसेनेच्या बैठकीत भाजपाने 102 जागांवर दावा केला आहे. तर शिंदेंच्या शिवसेनेने 109 जागांवर दावा केला. (Devendra Fadnavis-मराठी)
भाजपाने 2017 ला जिंकलेल्या सर्व 82 जागांवर दावा केला आहे. तर भाजपाने 2017 ला दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या जागांवरही दावा केल्याची माहिती समोर आली आहे. तसेच शिंदेंच्या शिवसेनेकडून 109 जागांवर दावा करण्यात आला आहे. शिंदेंच्या शिवसेनेने जिंकलेल्या 84 जागा जशाच्या तशा मागितल्या आहेत. (BMC Election 2025)
211 पैकी 150 जागांवर दोघांची सहमती झाली असून त्यात 102 जागा भाजपाकडे आणि उर्वरित शिवसेनेकडे जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दरम्यान उर्वरित 77 जागांवर दोन्ही पक्षांनी दावा कायम ठेवला आहे. शिवसेनेकडून करण्यात येणाऱ्या दाव्यानुसार 2017 च्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या निकालांनाच एकमेव आधार मानण्यास भाजपाने नकार दिला आहे, कारण अनेक प्रभागातील राजकीय परिस्थिती आता बदलली आहे, असं भाजपाकडून सांगण्यात येत आहे.
मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. मुंबई महापालिकेच्या निवडणूकीसाठी अंतिम मतदार यादी, मतदारांची आकडेवारी मुंबई महापालिकेने जाहीर केली आहे. मुंबईत एकूण 1 कोटी 3 लाख मतदार असून त्यापैकी 53 टक्के पुरुष मतदार तर 47 टक्के स्त्री मतदार आहे. यातील सर्वाधिक मतदार चांदिवली परिसरातील प्रभागात असून कमी मतदार सायन कोळीवाडा परिसरातील प्रभागात आहेत. सर्वात जास्त मतदार चांदिवलीतील प्रभाग क्रमांक 164 मध्ये तर सर्वात कमी मतदार सायन कोळीवाडा मधील प्रभाग क्रमांक 176 मध्ये आहे. तर सर्वाधिक महिला मतदार बोरिवलीतील प्रभाग क्रमांक 15 मध्ये आहेत.
शिवसेना- 84
भाजप- 82
काँग्रेस- 31
राष्ट्रवादी काँग्रेस- 9
मनसे- 7
समाजवादी पक्ष- 6
एमआयएम- 2
अपक्ष- 5
आणखी वाचा