शिळी पोळी खाताय… होईल नुकसान… जाणून घ्या सेवन करण्याची योग्य पद्धत
Tv9 Marathi December 20, 2025 02:45 PM

भारतात अनेक घरांमध्ये रात्री चपाती लागतेच… पण कधी-कधी रात्री बनवलेल्या पोळ्या उरतात… त्याच पोळ्या अनेक जण सकाळी खातात… तर काही घरांमध्ये शिळ्या पोळ्या फेकून दिल्या जातात. तर काही घरांमध्ये शिळ्या पोळ्या हेल्दी मानल्या जातात. आयुर्वेदानुसार, शिळी पोळी योग्य पद्धतीने खाल्ल्यास ती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. परंतु, योग्य वेळी न खाल्ल्यास ती आरोग्यासाठी हानिकारक देखील ठरू शकते. अशात, शिळी पोळी खाण्याचे तोटे काय हे जाणून घ्या… शिळी पोळी खाण्याची योग्य वेळ कोणती आहे हे देखील जाणून घेऊ.

शिळी पोळी खाण्याचे नुकसान…

फूड पॉइजनिंगची भीती – जर पोळीला 12-15 तासांपेक्षा जास्त काळ झाला असेल तर त्यात बॅक्टेरिया वाढू शकतात. अशी पोळी खाल्ल्याने पोटात संसर्ग, उलट्या किंवा जुलाब (Food Poisoning) होऊ शकतात.

पचन समस्या – शिळी पोळी ताज्या पोळीपेक्षा घट्ट होते आणि पचायला जास्त कठीण असते, ज्यामुळे काही लोकांना जडपणा किंवा गॅसेस वाटू शकतो. त्यामुळे शिळी पोळी खाणं टाळं…

बुरशीची भीती – दमट हवामानात म्हणजे पावसाळ्यात शिळ्या पोळीवर लवकर बुरशी येऊ शकते. जरी हा बुरशी बहुतेकदा डोळ्यांना दिसत नसला तरी, त्यामुळे पोटात गंभीर संसर्ग होऊ शकतो.

पौष्टिक कमतरता – ताज्या पोळीमधील जीवनसत्त्वे आणि आर्द्रता कालांतराने कमी होऊ लागते. शिळी पोळी खाल्ल्याने तुमच्या शरीराला आवश्यक असलेले पोषण मिळत नाही.

शिळी पोळी खाताना ‘या’ गोष्टींची काळजी घ्या…

पोळी बनवल्यानंतर ती पोळी 8 ते 12 तासांमध्ये खा. शिवाय पोळी ठेवण्यासाठी देखील खास पद्धत आहे. पोळी नेहमी स्वच्छ, कोरड्या आणि हवाबंद डब्यात ठेवा. जर पोळीमधून थोडासाही वास येत असेल तर तो खाऊ नका.

पोळी शिळी असल्यास कधीही गरम करुनच खा… शिळी पोळी खाण्यापूर्वी ती पूर्णपणे गरम करा किंवा दुधात उकळून खा, यामुळे बॅक्टेरियाचा धोका कमी होतो.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.