एपस्टीन फाइल्स प्रसिद्ध, जगात भूकंप, ते फोटो पुढे येताच मोठी खळबळ, मायकल जॅक्सनही..
GH News December 20, 2025 02:11 PM

अमेरिकेच्या न्याय विभागाने जेफ्री एपस्टीनच्या चौकशीचा भाग म्हणून शुक्रवारी तब्बल 300,000 कागदपत्रे प्रसिद्ध केली आहेत. यामध्ये काही फोटोही आहेत. या प्रसिद्ध केलेल्या कागदपत्रांमुळे मोठी खळबळ उडाली आहे. फक्त अमेरिकेतच नाही तर जगभरात भूकंप आला. सुरूवातीला सांगितले गेले की, या कागदपत्रांमध्ये भारतातील मोठ्या नेत्यांचेही फोटो आहेत. तसा दावा कॉंग्रेसकडून करण्यात आला. मात्र, सध्या प्रसिद्ध झालेल्या कागदपत्रांमध्ये अमेरिकेतीलच नामंकित लोकांची फोटो पुढे आली आहेत. 300,000 कागदपत्रासह प्रसिद्ध झालेल्या फोटोंमुळे जग थक्क झालंय. समोर आलेल्या कागदपत्रांमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, अभिनेता ख्रिस टकर, पॉप गायक मायकल जॅक्सन आणि ब्रिटिश राजकुमार अँड्र्यू यांसारख्या प्रमुख व्यक्तींचे खळबळ उडवणारे फोटो आले.

पॉप गायक मायकल जॅक्सन याचा चाहतावर्ग अत्यंत मोठा आहे. त्यामध्येच त्याचे फोटो पुढे आल्याने सर्वांनाच मोठा धक्का बसला. या कागदपत्रांहून असे दिसून येते की, मायकल जॅक्सनचे नाव एपस्टीनच्या संपर्क याद्या आणि सामाजिक नोंदींमध्ये होते. न्यायालयातील कागदपत्रांनुसार, जॅक्सनने फ्लोरिडा येथील पाम बीचमधील एपस्टीनच्या निवासस्थानी  एकदा भेट दिली होती.

आजपर्यंत मायकल जॅक्सनचा एपस्टीनच्या गुन्ह्यांशी काही संबंध होता, असे सुचवणारा कोणताही पुरावा समोर आलेला नाही. त्याच्या नावाचा उल्लेख केवळ सामाजिक ओळखीच्या संदर्भात केला जातो. रोलिंग स्टोन्सचे मुख्य गायक मिक जॅगरचे नावही एपस्टीन फाइल्समध्ये समोर आले आहे. एपस्टीनसोबत सामाजिक संबंध असलेल्या अनेक सेलिब्रिटींमध्ये जॅगर यांचाही समावेश आहे.

ही हैराण करणारी कागदपत्रे सध्या पुढे आली असून अजूनही काही माहिती पुढे येण्याचे मोठे संकेत आहेत. हेच नाही तर राज्यातील एका बड्या कॉंग्रेस नेत्याने दावा केला होता की,एपस्टीन फाइल्स पुढे आल्यानंतर देशातील राजकारणात मोठे बदल होतील आणि एक मराठी व्यक्ती पंतप्रधान पदावर बसू शकतो. मात्र, सध्यातरी या कागदपत्रांमध्ये किंवा फोटोमध्ये भारतातील नेत्याची माहिती पुढे आली नाही. अजून काही दस्ताऐवज पुढे येऊ शकतात, असेही काही रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.