अमेरिकेच्या राजकारणात एपस्टीन फाइल्सनी सध्या मोठी खळबळ उडवून दिली आहे. या फाइलमधील गोष्टी बाहेर आल्याने अनेक धक्कादायक गौप्यस्फोट सुरु झाले आहेत. आता अजून एक मोठा पर्दाफाश झाला आहे. अलीकडेच एक फोटो समोर आलाय, त्यात अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन मुलींसोबत पूलमध्ये आंघोळ करताना दिसले. अमेरिकी जस्टिस डिपार्टमेंटने जेफ्री एपस्टीन यांच्या चौकशीशी संबंधित 3 लाख कागदपत्र शुक्रवारी रात्री अडीच वाजता सार्वजनिक केली.या फोटोंमध्ये अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बिल क्लिंटन, पॉप सिंगर मायकल जॅक्सन, हॉलिवूड अभिनेता क्रिस टकर सारख्या दिग्गजांचे फोटो समोर आले आहेत. काही फोटोंमध्ये क्लिंटन मुलींसोबत पूलमध्ये आंघोळ करताना आणि पार्टी करताना दिसत आहेत. या फाइल्समध्ये विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा फार उल्लेख नाहीय.
जेफ्री एपस्टीन अब्जाधीश होता. अल्पवयीन मुलींच तो ट्रॅफिकिंग करायचा असा त्याच्यावर आरोप आहे. तो मुलींना आपल्या हाय प्रोफाइल क्लाइंट्सकडे पाठवायचा. नंतर त्या मुलींच शोषण केलं जायचं. अनेक मुलींनी जेफ्री एपस्टीनवर खळबळजनक आरोप केले होते. त्यानंतरच एपस्टीन फाइल्सबद्दल मोठे खुलासे होतं आहेत. जेफ्री एप्स्टीन आणि ट्रम्प यांच्यात सोशल रिलेशन असल्याचं या फाइल्समधून समोर आलय. 1990 च्या दशकात आणि 2000 च्या सुरुवातीला जेफ्री एप्स्टीन आणि ट्रम्प यांच्यात चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. अलीकडेच बाहेर आलेल्या फोटोंमध्ये ट्रम्प यांचा उल्लेख नाही.
ट्रम्प यांना स्वाक्षरी करावी लागली
न्याय विभागाने प्रसिद्ध केलेल्या फोटोंमध्ये बिल क्लिंटन यांनी मायकल जॅक्सनच्या खांद्यावर हात ठेवल्याचा फोटो आहे. त्याचवेळी सुप्रीम्स समूहाची सिंगर डायना रॉस उजव्या बाजूला उभी आहे. या फोटोंमध्ये जेफ्री एप्स्टीन दिसत नाही. काही फोटोंमध्ये क्लिंटन पूलमध्ये मुलींसोबत आंघोळ करताना दिसतायत. काँग्रेस मध्ये रिपब्लिकन खासदारांच्या दबावाखाली ट्रम्प यांनी 19 नोव्हेंबरला एका कायद्यावर स्वाक्षरी केली. त्यानंतर अमेरिकी न्याय विभागाला 30 दिवसांच्या आत एप्स्टीन फाइल्सशी संबंधित फाईल्स सार्वजनिक करायच्या होत्या. यात कोठडीत असताना एप्स्टीनचा मृत्यू झाला. त्याची सुद्धा कागदपत्र आहेत.
प्रवक्त्या एंजेल उरेआ काय म्हणाल्या?
माजी राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्या एंजेल उरेआ म्हणाल्या की, “एप्स्टीन यांची चौकशी बिल क्लिंटन यांच्याविषयी नव्हती. त्यांनी 20 वर्ष जुना धुरकट फोटो जारी केला असला तरी तो बिल क्लिंटन यांच्याशी संबंधित नाही. इथे दोन प्रकारचे लोक आहेत. एक ते, ज्यांना काही माहित नव्हतं आणि गुन्हा समोर आल्यानंतर एप्स्टीन यांच्याशी संबंध तोडले. दुसरे ते ज्यांनी संबंध कायम ठेवले. आम्ही पहिल्या गटात येतो”