पुणे: राज्यातील महानगरपालिका निवडणुकांची (mahanagar palika election) तयारी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे, राजकीय पक्षांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने हालाचाली सुरू झाल्या आहेत, इच्छुकांच्या मुलाखती, चर्चा, युती, जागावाटप यासंबंधीच्या चर्चा सुरू आहेत, अशातच महायुतीत मित्रपक्ष काही ठिकाणी सोबत तर काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात लढणार असं चित्र निर्माण झालं आहे, जागावाटपासाठी बैठकांना देखील वेग आला आहे. अशातच पुण्यात महायुतीतील शिवसेना आणि भाजपची (Shivsena And BJP) एक बैठक पार पडली होती. या बैठकीआधी शिवसेनेचे नेते रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) १६५ जागांवर उमेदवार देण्यासाठी ठाम होते, तर शहरप्रमुख नाना भानगिरे महायुतीसोबत (mahanagar palika election) युती करण्यावर ठाम होते आणि त्यांनी भाजपकडे ३५-४० जागा मागणार असल्याचं सांगितलं होतं. याबाबत महायुतीची जी बैठक पार पडली, त्या बैठकीला रविंद्र धंगेकरांना बोलवण्यात आलं नव्हतं, याबाबत आज रविंद्र धंगेकरांनी एबीपी माझाशी बोलताना सविस्तर भाष्य केलं आहे.
धंगेकर म्हणाले की, महायुतीच्या बैठकीला गेलो नाही, पण शिवसेनेच्या आज होणाऱ्या बैठकीला मी जाणार आहे. १६५ जागांसाठी एकनाथ शिंदे यांच्याकडे मागणी करणार असल्याचं रवींद्र धंगेकरांनी सांगितलं आहे. मात्र शिवसेनेकडून भाजपकडे ३५-४० जनासाठी प्रस्ताव दिला जाणार आहे. युतीत बाजूला ठेवलं की नाही माहित नाही पण पक्षाचं नीट व्हावं अशी इच्छा धंगेकर यांनी व्यक्त केली आहे. एकनाथ शिंदे यांचा शब्द शेवटचा असल्याचं त्यांनी बोलून दाखवलं आहे. मी पक्षावर किंवा पक्ष माझ्यावर नाराज नाही, स्थानिक नेते आणि आमची बैठक होणार आहे. त्या बैठकीला मी हजर राहणार आहे. त्यावेळी मी एकनाथ शिंदे यांना 165 जागांसाठी अहवाल पाठवणार आहे, भाजपकडून पुण्यात 125 जागा निवडून येण्याचा दावा केला जात आहे त्यामुळे 35 ते 40 जागा शिवसेनेला मिळण्याची चर्चा आहे मात्र रवींद्र धंगेकर 165 जागांवर ठाम असल्याचं दिसून येत आहे.
आज शिवसेनेची नेत्यांची बैठक शिवसेना कार्यालयात पार पडणार आहे, या बैठकीला नाना भानगिरे आणि पुण्यातील स्थानिक नेते हजर राहणार आहेत त्यावेळी रवींद्र धंगेकर देखील तिथे उपस्थित असणार आहेत, स्थानिक नेते चर्चा करून त्यांच्या एकमताने निर्णय घेऊन तो अहवाल पक्षाकडे पाठवणार असल्याचं रवींद्र धंगेकर यांनी सांगितलं आहे, दरम्यान नाना भानगिरे यांनी देखील याबाबत माहिती देताना आजच्या बैठकीनंतरचा अहवाल एकनाथ शिंदेंना पाठवणार असल्याची माहिती दिली आहे.
तर मिळालेल्या माहितीनुसार, भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून पुणे महापालिकेत किमान १२५ जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुणे दौऱ्यात भाजप आणि शिवसेना एकत्र निवडणूक लढवणार असल्याची अधिकृत घोषणा केल्यानंतर जागावाटपाबाबत हालचालींना वेग आला आहे.
आणखी वाचा