Dhurandhar vs Avatar-Fire and Ash Collection : 'अवतार'च्या रिलीजनंतरही बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर' ची हवा, रणवीरच्या चित्रपटाने किती कोटी कमावले?
Saam TV December 20, 2025 05:45 PM

'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला.

'अवतार: फायर अँड ॲश' चित्रपट 19 डिसेंबर 2025ला प्रदर्शित झाला आहे.

'धुरंधर' चित्रपटाने 'अवतार: फायर अँड ॲश' सिनेमाला पहिल्याच दिवशी मागे टाकले आहे.

गेले दोन आठवडे बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चा डंका पाहायला मिळत आहे. 'धुरंधर' लवकरच 500 कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. आदित्य धर दिग्दर्शित 'धुरंधर' चित्रपट 5 डिसेंबर 2025 ला थिएटरमध्ये रिलीज झाला. कंधार अपहरण आणि २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यांसह अनेक सत्य घटनांपासून चित्रपट प्रेरित आहे. तर आता 19 डिसेंबर 2025 ला जेम्स कॅमेरॉनचा 'अवतार: फायर अँड ॲश' रिलीज झाला आहे. चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होते. दोन्ही चित्रपटांचे कलेक्शन जाणून घेऊयात.

View this post on Instagram