Ishan Kishan: T20 वर्ल्डकपसाठी पठ्ठ्याची झाली निवड, म्हणाला या धार्मिक पुस्तकामुळे मिळाले बळ, तुम्ही सुद्धा वाचता का?
GH News December 20, 2025 06:11 PM

Ishan Kishan Shrimad Bhagavad Gita: ईशान किशन याची टी20 वर्ल्डकपसाठी (T20 WC 2026) टीम इंडियामध्ये निवड झाली आहे. या जागतिक स्पर्धेसाठी अद्याप दीड महिना अवकाश आहे. पण त्याअगोदरच संघाची निवड झाली आहे. सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात टीम इंडियाला चुणूक दाखवण्याची संधी मिळाली आहे. या संघात काही दिग्गजांना डच्चू देण्यात आला असला तरी हुकमी एक्का ईशान किशनचे नाणं वाजलं आहे. त्यानं संकटाच्या काळात या धार्मिक पुस्तकामुळे आपल्याला कायम ऊर्जा आणि प्रेरणा मिळत असल्याचे सांगितले. जेव्हा पण मन उदास होते अथवा संकटांची मालिका सुरु होते, तेव्हा तेव्हा आपण हे पुस्तक वाचतो आणि पुन्हा नव्याने भरारी घेतो असं त्यानं सांगितलं आहे. ईशान किशन श्रीमद भगवत गीता वाचतो. त्यातून त्याला प्रेरणा मिळत असल्याचे त्याने सांगितले.

आईने दिला गीता वाचण्याचा सल्ला

ईशान किशन याने सांगितले की, त्याच्या आईने त्याला गीता वाचनाचा सल्ला दिला. जेव्हा तू खूप ताणतनावात असशील, संकटांची मालिका असेल आणि जेव्हा काही प्रश्नांची उत्तर मिळत नसतील, तेव्हा गीता वाच. तू जे पान उघडशील, त्यातून तुला तुझे उत्तर मिळेल. तुला उत्तर मिळणार नाही, तर प्रेरणा मिळेल. मला जेव्हा प्रश्नांची उत्तरं मिळत नाहीत, तेव्हा मी गीता वाचते, असा सल्ला त्याच्या आईने ईशानला दिला होता. ईशान याने आईचा सल्ला मानला. त्यानंतर त्याला अनेक गोष्टींचा अनुभव आला.

तो गीता आता कायम सोबत ठेवतो. त्याला गीता वाचल्याशिवाय चैन पडत नाही.त्याच्या किटबॅगमध्ये गीता असते. तो नेहमी पॉकेट गीता सोबत ठेवतो. जेव्हा त्याचे मन अस्वस्थ होते. अथवा त्याला बैचेन वाटते.तेव्हा तो गीता वाचतो. तो कोणतेही पान उघडतो आणि वाचायला सुरुवात करतो. त्याचा अर्थ समजून घेतो. तो म्हणतो, गीता वाचन आता एक सवय झाली आहे. त्याच्या गेल्या काही सामन्यात त्याची ही आध्यात्मिक शक्ती दिसून आली आहे. तो विश्वासाने खेळल्याचा तो दावा करतो.

प्रत्येक वेळी गीतेचा मोठा आधार

श्रीमद भगवत गीता वाचणामुळे प्रत्येकवेळी कोणीतरी सोबत असल्याचा भास होतो. एक शक्ती प्रत्येकवेळी सोबत असल्याचे जाणवते. परिपक्वता आणि संकटातून बाहेर येण्याची क्षमता वाढल्याचे तो म्हणतो. गीता वाचल्यामुळे आता आपण नवशिख्यासारखं खेळत नाही. विचारपूर्वक खेळी खेळण्याचा प्रयत्न करतो. घाईत कोणताही निर्णय घेत नाही. घाईगडबडीत कोणताही चेंडू टोलवत नाही. त्याचे टीममधील सहकारी पण ईशानमध्ये मोठा बदल झाल्याचे मान्य करतात. त्यांच्या मते, तो आता प्रगल्भ झाला आहे. त्याला खेळातील उतार चढावांचं गणित उमगलं आहे. तो आता भावनांवर नियंत्रण ठेवण्यास शिकला आहे. कुठे आणि कसं खेळावं आणि कशी फटकेबाजी करावी याचं गणित त्याला कळलं आहे. आता टीम इंडियात टी 20 वर्ल्डकपसाठी त्याची झालेली निवड ही त्याच चिकाटीचे फळ असल्याचे सहकारी सांगतात.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.