कोल्हापूर : निवडणुकीच्या रिंगणात समोर तगडा प्रतिस्पर्धी येण्याचे संकेत मिळू लागल्यानंतर इच्छुकांनी उमेदवारी घोषित होण्याची प्रतीक्षा करण्याआधीच प्रचाराची आघाडी उघडली आहे. मतदारांना आतापासूनच आकृष्ट करण्यासाठी विविध क्लुप्त्या लढवल्या जात आहेत.
त्यातूनच यंदा चार सदस्यीय प्रभागरचनेमुळे मतदारांना ‘लक्ष्मी’ दर्शनाचा मोठा योग जुळून येत आहे. अनेकांनी पहिल्या टप्प्यातच केलेल्या सुरूवातीने हे दर्शन किती तरी ‘उंची’वर जाणार याचा अंदाज येऊ लागला आहे. आगामी काळात त्यात वाढच होण्याची शक्यता असून, त्यामुळे इच्छुकांची मात्र चांगलीच दमछाक होणार आहे.
Kolhapur Elections : उमेदवारी जाहीर होण्याआधीच कोल्हापुरात प्रचाराचा गुलाल; पदयात्रा, हलगी-घुमक्यांनी वातावरण तापले काहींनी उघडला हातकाही प्रभागांमध्ये माजी पदाधिकारी, व्यावसायिक रिंगणात राहणार हे स्पष्ट होत आहे. त्यांच्याकडे ‘पाठिंबा’ भरभक्कम आहे. त्यामुळे त्यांनी थेट नेत्यांनाच आपला हात उघडा ठेवला जाईल, असा विश्वास दिला आहे.
एक-एक नगरसेवक महत्त्वाचा ठरणार असल्याने प्रभागात असे इच्छुक असल्यास त्यातील इतर नगरसेवकांनाही चांगले बळ मिळू शकते. नेत्यांनाही अशा उमेदवारांची निकड आहे. नेत्यांची जी ‘अपेक्षा’ आहे, ती इच्छुकांकडून पाचपटीने जास्त पूर्ण करण्याची तयारी आहे. त्यामुळे नेत्यांची अशा प्रभागांची ‘जबाबदारी’ थोडी कमी होण्यास मदत होणार आहे.
Kolhapur Election : वीस प्रभागांतून तब्बल ३२९ इच्छुक; काँग्रेससमोर उमेदवार निवडीचे मोठे आव्हानमहापालिकेच्या निवडणुकीचे रणांगण तापू लागले आहे. दहा वर्षांपासून असलेल्या इच्छुकांना ही मोठी संधी असल्याने त्यांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. ज्यांना कुणाचाही पक्ष चालतो फक्त निवडणूक लढवायची आहे.
अशांनीही फिल्डिंग लावली आहे. नवीन झालेल्या प्रभागात अनेकांचे मूळ भाग तर काहींचे तुटलेले भाग आहेत. आपल्या मूळ भागातील मतदारांना सोबत ठेवण्यासाठी प्रभाग रचना झाल्यापासून संपर्क वाढवला आहे.
त्यांनी विविध प्रकारच्या भेटी दिवाळीच्या दरम्यान पाठवून एकप्रकारे आपली उमेदवारीच घोषित केली होती. निवडणूक जाहीर झाल्यानंतर प्रचाराला सुरूवात झाली असून, अनेक प्रतिस्पर्धीही तयार झाले आहेत.
जुन्या इच्छुकांनी आपल्या मतदारांना विश्वास देण्याचे काम चालवले आहे, तर नवीन भागातील मतदारांना आपल्यासोबत ठेवण्यासाठी ‘लक्ष्मी’ दर्शनाच्या नियोजनाला सुरूवात केली आहे. अजून उमेदवारी अर्ज दाखल केलेले नसतानाच ‘टोकन’ स्वरुपातील विश्वास दिला जाऊ लागला आहे.
उमेदवारी निश्चित झाल्यानंतर चिन्हासह मतदारांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. त्यावेळी प्रतिस्पर्ध्यांकडून काय रणनीती आखली जाते, यावर पुढील टप्प्यावर जायचे नियोजन केले आहे. यामुळे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हा खेळ चांगलाच रंगण्याची चिन्हे आहेत. तो ‘सात-आठ’ पटीने ‘दहा’ पटीने वाढण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.