मुंबई : दादर , अंधेरी पूर्व , सांताक्रूझ पूर्व या विभागातील विभागातील मोठ्या आकाराच्या जलवाहिनी जोडणीचे काम हाती घेतले जाणार आहे. हे काम सोमवारी (ता. २२) सकाळी १० वाजेपासून शुक्रवारी (ता. २६) मध्यरात्रीनंतर १ वाजेपर्यंत (एकूण ८७ तास) सुरु राहणार आहे. परिणामी, दादर, अंधेरी पूर्व, सांताक्रूझ पूर्व या विभागातील काही भागांचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे. तसेच, नियमित पाणीपुरवठ्याच्या वेळेत देखील बदल होणार आहे, याची नागरिकांनी पुरेसा पाणीसाठा करून ठेवावा अशी असे आवाहन पालिकेने केले आहे.
एमएमआरडीएच्या मेट्रो लाईन ७ अ प्रकल्पाच्या कामासाठी २४०० मिलीमीटर व्यासाच्या अपर वैतरणा मुख्य जलवाहिनीचा काही भाग वळविण्यात आला आहे. या वळविण्यात आलेल्या भागाचे छेद जोडणीचे काम पालिकेमार्फत करण्यात येणार आहे. ही कार्यवाही अत्यंत महत्त्वाची असून नियोजनबद्ध पद्धतीने व तांत्रिक निकषांचे पालन करून करण्यात येणार आहे. या दरम्यान नागरिकांना पाणीपुरवठ्यात कमीतकमी अडथळा येईल, यासाठी आवश्यक ते नियोजन करण्यात आले आहे.
Thane Politics: ठाकरे गटाला मोठं खिंडार! बड्या शिलेदारानं सोडली साथ, हाती कमळ घेतं भाजपात प्रवेश दादर विभागधारावी लूप मार्ग, ए. के. जी. नगर, धारावी सकाळचा पाणीपुरवठा- जस्मिन मील मार्ग, माटुंगा कामगार वसाहत, संत रोहिदास मार्ग, ६० फूट मार्ग, ९० फूट मार्ग, संत कक्कैया मार्ग, एम. पी. नगर ढोरवाडा, महात्मा गांधी मार्ग या भागात कामाच्या कालावधीत दररोज सकाळी ९.०० ते सायंकाळी ५.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल तसेच धारावी मुख्य मार्ग, गणेश मंदीर मार्ग, दिलीप कदम मार्ग, जस्मिन मील मार्ग, माहीम फाटक, ए. के. जी. नगर या भागात कामाच्या कालावधीत ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा,होईल.
अंधेरी पूर्व विभागकबीर नगर, बामणवाडा, पारसीवाडा, विमानतळ क्षेत्र, तरुण भारत वसाहत, इस्लामपुरा, देऊळवाडी, पी ऍन्ड टी वसाहत या विभागात कामाच्या वेळेत दररोज दुपारी २.०० ते सायंकाळी ५.३० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल तसेच कोलडोंगरी, जुनी पोलीस गल्ली, विजय नगर (सहार रस्ता) मोगरापाडा कामाच्या कालावधीत दररोज सायंकाळी ५.०० ते रात्री १०.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.
Mumbai Local Megablock: मुंबई लोकलनं प्रवास करताय? पण मेगाहाल होणार; पाहा कुठे अन् कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक? सांताक्रूझ विभागवांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) मोतिलाल नगरसह या भागातही कामाच्या काळात दररोज रात्री १०.०० ते रात्री ११.४० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल. तसेच प्रभात वसाहत, टीपीस-३, आग्रीपाडा, कलिना, सीएसटी मार्ग, हंसभुग्रा मार्ग, विद्यापीठ, सीएसटी मार्गाची दक्षिण बाजू, यशवंत नगर, सुंदर नगर, कोलिवरी गाव, तीन बंगला, शांतिलाल कंपाऊंड, पटेल कंपाऊंड, गोळीबार मार्ग, खार भुयारी मार्ग (सब वे) ते खेरवाडी, नवापाडा, बेहराम नगर, ए. के. मार्ग, शासकीय वसाहत वांद्रे (पूर्व) या विभागात कामाच्या कालावधीत दररोज मध्यरात्री ३.३० नंतर ते सकाळी ९.०० या वेळेत कमी दाबाने पाणीपुरवठा होईल.