पाच पोलिसपाटील यांचा पोलिस अधीक्षकांकडून गौरव
esakal December 21, 2025 01:45 PM

-rat19p20.jpg-
P25O11830
रत्नागिरी ः रत्नागिरी पोलिस अधीक्षक कार्यालयातर्फे सत्कार करण्यात आलेले पूर्णगड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाच गावांचे पोलिसपाटील.
----
पोलिसपाटीलांचा पोलिस अधीक्षकांकडून गौरव
उत्कृष्ट कामगिरी ; निरूळ, नाखरे, गणेशगुळे, डोर्ले, कुर्धेचा समावेश
सकाळ वृत्तसेवा
पावस, ता. २० ः मिशन जीवनअंतर्गत विशेष उपक्रमामध्ये केलेल्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षकांकडून पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील पाच पोलिसपाटील यांचा सन्मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला. त्यामध्ये निरूळ पोलिस पाटील अपर्णा निरूळकर, नाखरेतील सुधीर डाळिंबे, गणेशगुळेतील संतोष लाड, डोर्लेतील कल्याणी हळदवणेकर, कुर्धेचे वैभव शिंदे यांचा समावेश आहे.
पूर्णगड सागरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील या पाच गावांमध्ये या पोलिस पाटलांनी ज्येष्ठ नागरिकांची माहिती घेऊन त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. त्यांना योग्य तऱ्हेने मदत केल्याने त्यांना गावामध्ये एक हक्काचा माणूस आपली काळजी घेणारा सापडल्याबद्दल ज्येष्ठ नागरिकांनी समाधान व्यक्त केले. त्याचबरोबर परिसरातील ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे करून त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
-------
कोट
गावामध्ये पोलिसपाटील म्हणून काम करत असताना नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्याचे काम सातत्याने केले जाते. त्यामुळे नागरिकांमध्ये पोलिस पाटलांबद्दल एक विश्वासाचे नाते तयार झाल्यामुळे प्रत्येकजण आपल्या अडीअडचणी मांडत असतात. त्या सोडवण्याचे काम केले जाते.
- कल्याणी हळदवणेकर, पोलिसपाटील, डोर्ले

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.