बॉलिवूड अभिनेत्री राधिका आपटे सध्या तिच्या नुकत्याच रिलीज झालेल्या 'साली मोहब्बत' वेब सीरिज आणि चित्रपट 'रात अकेली है - द बंसल मर्डर्स'मुळे चर्चेत आली आहे. राधिकाच्या दोन्हीमधील भूमिका गाजल्या. राधिकाने बॉलिवूडसोबतच साऊथ फिल्म इंडस्ट्रीतही काम केले आहे. अलीकडे राधिका आपटेने साऊथ फिल्ममेकर्ससोबत काम करण्याबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. तिने सांगितले की, त्यांनी तिच्या शरीरात जास्त पॅडिंग लावण्यास सांगितले होते.
स्क्रीनवर दिव्येंदु शर्माशी बोलताना राधिका आपटेने दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये काम करण्याबाबत वक्तव्य केले आहे. 'मी काही साऊथ इंडियन चित्रपट पैशांची खूप गरज असल्यामुळे केले. गोष्ट अशी आहे की तिथेही खूप चांगले चित्रपट बनतात, विशेषतः साऊथ इंडियात. मी साऊथ इंडियन चित्रपटांना एकतर्फी म्हणत नाही कारण प्रत्येक इंडस्ट्रीत उत्तम चित्रपट बनतात. पण काही चित्रपटांमध्ये मला खूप अडचणींचा सामना करावा लागला.'
राधिका आपटेने एका साऊथ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानची आठवण सांगितली आहे. ती म्हणाली, 'मला आठवते की एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान, जेव्हा आम्ही एका छोट्याशा गावात होतो, तेव्हा मला जाणीव झाली की मी सेटवर एकटीच महिला होते.
पुढे ती म्हणाली की ते माझ्या बट आणि ब्रेस्टवर जास्त पॅडिंग लावायला सांगायचे. ते मला म्हणायचे की अम्मा, जरा जास्त पॅडिंग लावा! आणि मी विचार करायचे की किती पॅडिंग? तुम्ही एखाद्याला आणखी किती गोलाकार बनवणार? मग मी डायरेक्टरला म्हणाले की पॅडिंग नाही. मी एकटीच महिला होते! माझ्याकडे मॅनेजर नव्हता, एजंट नव्हता, संपूर्ण टीममध्ये पुरुषच होते. तेव्हाच मला प्रथमच जाणीव झाली की ओह माय गुडनेस.'
राधिका आपटेने अनेक साऊथ इंडियन चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनेत्रीने 'ऑल इन ऑल अझगु राजा', 'वेट्री सेल्वन' आणि 'कबाली' अशा तमिळ चित्रपटांचा समावेश आहे. याशिवाय तिने नंदामुरी बालकृष्णसोबत तेलुगू चित्रपट 'लीजेंड'मध्येही काम केले आहे.