भारती सिंह दुसऱ्यांदा आई बनली असून 19 डिसेंबर रोजी तिने मुलाला जन्म दिला. डिलिव्हरीच्या आधी तिला प्रचंड वेदना जाणवत होत्या. 19 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजताच्या सुमारास अचानक तिची पिशवी फाटली. यामुळे ती घाबरून उठली.
अंथरुण पूर्ण ओलं झालं होतं आणि मी खूप घाबरली होती. मी लगेच हर्षला उठवलं. त्याने डॉक्टरांना फोन करून माहिती दिली तेव्हा डॉक्टर म्हणाले की डिलिव्हरी करावी लागेल", असं सांगताना भारती भावूक झाली. रात्रभर अस्वस्थ वाटू लागल्याने ती प्रचंड घाबरली होती.
सकाळी 7 वाजताच्या सुमारास भारतीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर तिने दुसऱ्या मुलाला जन्म दिला. ऑपरेशन थिएटरबाहेर उभ्या असलेल्या हर्षने सांगितलं की यावेळी सर्वकाही अचानकच घडलं.
पहिल्या प्रेग्नंसीदरम्यान आम्ही आरामात रुग्णालयात आलो होतो आणि नंतर भारतीला प्रसूती कळा सुरू झाल्या होत्या. आठ ते दहा तास तिने प्रसूती कळा सोसल्या होत्या. यावेळी सर्वकाही अचानक अनपेक्षितपणे घडलं, असं हर्षने सांगितलं.
डिलिव्हरीच्या दोन तासांनंतर शुद्धीवर येताच भारतीने व्लॉगिंगला सुरुवात केली. या व्लॉगमध्ये तिने दुसऱ्यांदा आई होण्याचा अनुभव सांगितला. भारतीने यावेळी सांगितलं की, तिला मुलगी हवी होती. परंतु मुलगा झाल्यानेही खुश असल्याची भावना तिने व्यक्त केली.