राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून रविवारी सकाळी 10 वाजे पासून मतमोजणीला सुरुवात झाली आहे. 288 नगरपालिका, नगर परिषदा आणि नगरपंचायतींच्या निवडणुकीत कोण बाजी मारणार, कोणत्या पक्षाचा नगराध्यक्ष येणार हे निकालावर ठरणार आहे.
ALSO READ: नागपुरात भाजपचा महापौर असेल! नितीन गडकरींचा मोठा दावा
राज्यातील 29 मोठ्या पालिकांसाठी 15 जानेवरी रोजी निवडणुका होणार आहे. त्यापूर्वी या लहान नगरपालिका चे निकाल राज्यातील नंबर वन पक्ष कोणता आहे हे समजेल.
ALSO READ: भाजप-शिवसेना युतीबाबत 48 तासांत मोठा निर्णय घेतला जाणार
या निवडणुकीच्या निकालात अनेक मोठ्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. कणकवलीत निलेश राणे आणि रवींद्र चव्हाण वाद चर्चेत होते. निलेश राणेंना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाठिंबा आहे.
ALSO READ: उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने मनसेला ८ जागा देऊ केल्या
2 डिसेंबर रोजी 265 जागांसाठी आणि 20 डिसेंबर रोजी उर्वरित 23जागांसाठी मतदान पार पडले होते. बोगस मतदान, पैशांचे वाटप आणि पोलिसांच्या छापेमारीच्या आरोपांनी गाजलेल्या या निवडणुकीत आज मतदारांचा साथ कोणत्या पक्षाला मिळतो हे पाहणे उत्सुकतेचे आहे.
Edited By - Priya Dixit