Nanded Railway: अजमेर-हैदराबाद रेल्वेची २७ची फेरी रद्द
esakal December 22, 2025 02:45 AM

नांदेड : तांत्रिक कारणांमुळे अजमेर-हैदराबाद विशेष रेल्वेची एक फेरी रद्द करण्यात आली आहे. तसेच मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील दौंड-काष्टीदरम्यान दुहेरीकरणाचे काम हाती घेण्यात आल्याने काही प्रवासी रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

दक्षिण मध्य रेल्वे विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार गाडी क्रमांक ०७७३२ अजमेर-हैदराबाद विशेष रेल्वेची २७ डिसेंबरची एक फेरी तांत्रिक कारणांमुळे रद्द करण्यात आली आहे. या निर्णयामुळे प्रवाशांना होणाऱ्या गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे.

दरम्यान, मध्य रेल्वेच्या पुणे विभागात दौंड-काष्टीदरम्यान दुहेरीकरणाचे काम सुरू असल्याने लाइन ब्लॉक घेण्यात येणार आहे. या कामामुळे पुढील रेल्वे रद्द करण्यात आल्या आहेत. गाडी क्रमांक ११४१३ निझामाबाद-पंढरपूर : २५ जानेवारी २०२६ (रद्द), क्र. ११४१४ पंढरपूर-निझामाबाद : २६ जानेवारी २०२६ (रद्द), गाडी क्रमांक ११४१० निझामाबाद-पुणे : २६ जानेवारी २०२६ (रद्द).

Railway News: रेल्वेमध्ये पॉइंट्समन, गेटमन, ट्रॅकमनची कमतरता...; माजी सैनिक मैदानात उतरणार, प्रशासनाचा मोठा निर्णय अजमेर उरुसासाठी विशेष गाडी

अजमेर उरुसाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या सोयीसाठी अजमेर-हैदराबाद दरम्यान नांदेड मार्गे विशेष गाडी चालविण्यात येणार आहे. गाडी क्रमांक ०७७३० (अजमेर-हैदराबाद) : रविवार २८ डिसेंबर २०२५ या विशेष गाडीत वातानुकूलित, स्लीपर व जनरल सेकंड क्लास डब्यांचा समावेश राहणार आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.