'मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर...' अपघातानंतर नोरा फतेहीची पहिली प्रतिक्रिया, आता कशी आहे तब्येत?
esakal December 22, 2025 04:45 AM

Nora Fatehi Shares Health Update : बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री नोरा फतेही हिचा शनिवारी भीषण अपघात झाला होता. नोरा डेव्हिड गुएटा इथं कॉन्सर्टला जाताना तिच्या कारला दुसऱ्या कारने जोरदार धडक दिली. माहितीनुसार समोरच्या कारमधील व्यक्ती मद्यधुंद अवस्थेत होता. या अपघातात अभिनेत्री गंभीर जखमी झाली. त्यानंतर तिला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सगळ्यात महत्वाचं म्हणजे एवढी दुखापत होऊनही नोरा डेव्हिड गुएटाच्या कॉन्सर्टला उपस्थित राहिली.

कशी आहे नोरा फतेहीची तब्येत

नोराने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर पोस्ट करत तिच्या तब्येतीबाबत अपडेट दिली आहे. तिने व्हिडिओ शेअर केलाय. त्यात ती चाहत्यांना म्हणतेय की, 'हॅलो मित्रांनो मी जीवंत आहे. तसंच मी पुर्णपणे ठीक आहे. हे सांगण्यासाठीच मी हा व्हिडिओ केला आहे. शनिवारी माझा मोठा अपघात झाला. नशेत असलेल्या एका व्यक्तीनं माझ्या गाडीला जोरात धडक दिली. ती धडक इतकी जोरात होती की, माझी कार दुसऱ्या बाजुला फेकली गेली. त्यात माझं डोकं काचेला आपटलं.'

नोराच्या डोक्याला दुखापत

पुढे बोलताना नोरा फतेही म्हणाली की, ' मी जीवंत आहे. परंतु डोकं आदळल्यामुळे डोक्याला थोडी सूज आली आहे. तसंच थोडीची किरकोळ दुखापतसुद्धा झाली आहे. देवाच्या कृपेने मी ठिक आहे, नाहीतर परिस्थिती फार वाईट असू शकली असती.' तिची पोस्टनंतर चाहत्यांना तिची प्रचंड काळजी लागलीय. चाहते तिच्या व्हिडिओवर कमेंट्स करत तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन करत आहेत.

View this post on Instagram