टीम इंडियाचा अनुभवी ऑलराउंडर शार्दूल ठाकुर (Shardul Thakur) याच्या घरी छोट्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. शार्दूल आणि त्याची पत्नी मिताली पारुळकर (Mittali Parulkar) यांना पुत्र रत्नाचा लाभ झाला आहे. ठाकुर कुटुंबियात छोट्या पाहुणा आल्याची माहिती स्वत: शार्दुलने दिली आहे. शार्दुलने इंस्टाग्रामवर पोस्ट करत ही गोड आणि आनंदाची बातमी आपल्या चाहत्यांसह शेअर केली आहे. चाहत्यांनी कमेंट करुन शार्दूलच्या मुलाचं स्वागत केलं आहे. तसेच नेटकऱ्यांनी शार्दूल आणि त्याची पत्नी या दोघांचंही पुत्ररत्न प्राप्त झाल्यानंतर अभिनंदन केलंय.
मिताली-शार्दुल लग्नाच्या अडीच वर्षांनंतर आई-बाबामिताली आणि शार्दुल हे दोघे लग्नाच्या अडीच वर्षांनंतर आई-बाबा झाले आहेत. शार्दुल आणि मिताली यांचं हे पहिलंच अपत्य आहे. शार्दूल आणि मिताली 27 फेब्रुवारी 2023 रोजी विवाहबंधनात अडकले होते. शार्दुलने मुलाच्या जन्मानंतर इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. “वेलकम बेबी बॉय. आम्ही गेल्या 9 महिन्यांपासून तुझी प्रतिक्षा करत होतो. या विश्वात तुझं स्वागत आहे”, असं शार्दूलने त्याच्या पोस्टमध्ये म्हटलंय. तर आता चाहत्यांना शार्दुलच्या मुलाचं नाव काय असणार? याची प्रतिक्षा लागून आहे.
शार्दूल टीम इंडियातून आऊटशार्दूलने भारताचं कसोटी, एकदिवसीय आणि टी 20i या तिन्ही फॉर्मेटमध्ये प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र शार्दुल टीम इंडियातून 5 महिन्यांपासून बाहेर आहे. शार्दूलने शेवटचा आंतरराष्ट्रीय आणि कसोटी सामना हा 23 जुलै 2025 रोजी खेळला होता. तर शार्दूलने 19 ऑक्टोबर 2023 रोजी अखेरचा एकदिवसीय सामना खेळला होता. तसेच शार्दूलचं आता टी 20i संघात कमबॅक होईल का? याबाबतच शंका आहे. शार्दूल भारतासाठी अखेरचा टी 20i सामना हा 20 फेब्रुवारी 2022 रोजी खेळला होता.
देशांतर्गत क्रिकेटमध्ये नेतृत्वाची जबाबदारीशार्दुल टीम इंडियातून बाहेर असला तरी तो सातत्याने देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळतोय. शार्दुलने नुकत्याच झालेल्या सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत मुंबईचं नेतृत्व केलं होतं. शार्दूल त्याच्या नेतृत्वात मुंबईला अंतिम फेरीपर्यंत पोहचवण्यात अपयशी ठरला.
शार्दुलची सोशल मीडिया पोस्ट
शार्दुलची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
View this post on Instagram
A post shared by Shardul Thakur (@shardul_thakur)
शार्दुलने भारताचं आतापर्यंत 13 कसोटी सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. शार्दूलने या 13 सामन्यांमध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच शार्दुलने 377 धावाही केल्या आहेत. शार्दुल गेल्या काही वर्षांपासून भारतासाठी खेळतोय. मात्र त्याला कसोटी क्रिकेटमध्ये फार संधी मिळाली नाही. तसेच शार्दूने 47 एकदिवसीय सामन्यांमध्ये 65 विकेट्स घेण्यासह 329 रन्स केल्या आहेत. तसेच 25 टी 20i सामन्यांमध्ये 33 विकेट्स घेतल्या आहेत.