विनोद राऊत
मुंबई : काँग्रेस नेत्या प्रज्ञा सातव यांच्या भाजप प्रवेशामुळे सुरू झालेली पक्षगळती रोखण्याचे आव्हान काँग्रेसपुढे निर्माण झाले आहे. विधानसभेतील पक्षाचे संख्याबळ पाहता, भविष्यात काँग्रेसला उमेदवारही देता येणार नाही. त्यामुळे लवकरच कार्यकाळ संपणाऱ्या सदस्यांपैकी काही जण ‘प्रज्ञा सातव पॅटर्न’चा अवलंब करण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
काँग्रेसनेते दिवंगत राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांनी नुकताच आमदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या निर्णयामुळे काँग्रेसला विधान परिषदेत विरोधी पक्षनेतेपद गमवावे लागणार आहे; मात्र काँग्रेसपुढील संकटाची मालिका सातव यांच्यापुरती मर्यादित राहणार नसून, आगामी काळात इतर नेतेही सातव यांचा कित्ता गिरवू शकतात, अशी भीती पक्षनेतृत्वाला वाटत आहे.
Local Megablock: पश्चिम रेल्वेवर ३० दिवसांचा जम्बो ब्लॉक! ४७० लोकल फेऱ्या रद्द; प्रवाशांचे मेगाहाल होणार; नेमकं कारण काय?३ मे २०२६ रोजी विधान परिषदेच्या नऊ सदस्यांचा कार्यकाळ संपणार आहे. त्यात काँग्रेसच्या एका सदस्याचा समावेश आहे. तसेच ६ डिसेंबर २०२६ला पदवीधरचे तीन आणि शिक्षकचे दोन सदस्य निवृत्त होतील. यामध्येही काँग्रेसचे दोन सदस्य आहेत. परंतु सध्याची परिस्थिती पाहता, काँग्रेसच्या उमेदवाराला पुन्हा संधी मिळणे कठीण आहे. त्यामुळे स्वतःच्या राजकीय भवितव्यासाठी त्यांच्याकडून ‘सातव पॅटर्न’चा वापर केला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
भाजपची रणनीतीविधान परिषदेत काँग्रेसचे संख्याबळ मुदतीआधीच कमी करण्याची रणनीती भाजपने आखल्याची चर्चा आहे. काही सदस्यांना भाजपने थेट ऑफर दिल्याचे समजते. अद्याप त्यांनी याबाबत अंतिम निर्णय घेतला नसून, प्रसंगी तसा निर्णय घेतल्यास आश्चर्य वाटण्यासारखी परिस्थिती नाही. कारण या सदस्यांना देण्यासाठी सध्या काँग्रेसकडे ठोस पर्याय नसल्याने त्यांना रोखणे कठीण असल्याचे पक्षातील नेते मान्य करतात.
पदवीधर, शिक्षक आमदारांचे काय?खरे आव्हान पदवीधर व शिक्षक मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदारांबाबत आहे. विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर पक्षसंघटना कमकुवत झाली. पक्षाकडे संसाधनांची कमतरता आहे. तोपर्यंत जिल्हा परिषद, नगर परिषद आणि महापालिकांच्या निवडणुकांचे निकाल समोर येणार आहेत. विधानसभेप्रमाणे या निवडणुकांतही पक्षाची पीछेहाट झाल्यास पुढे काय, हा कळीचा प्रश्न आहे. अशा परिस्थितीत स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका लढवण्याची मानसिकता काँग्रेसच्या उमेदवारांची राहील का, असा सवाल उपस्थित होत आहे.
BMC Election: मुंबईतील भाजपचा 'हा' अभेद्य किल्ला ठाकरे बंधू जिंकणार का? मारवाडी, गुजराती आणि जैन मतदारांच्या हाती निर्णय पुढील वर्षी निवृत्त होणारे सदस्यकाँग्रेस - ३
भाजपा - ४
शिवसेना (ठाकरे) - १
शिवसेना (शिंदे) - १
अपक्ष - १
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) - २
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) - २
उद्धव ठाकरे
नीलम गोऱ्हे
शशिकांत शिंदे
अमोल मिटकरी
राजेश राठोड
आमदारांचा मुदतीपूर्व राजीनामा
रिक्त जागेवर भाजपकडून निवडणूक लढवली जाते.
विधान परिषदेत काँग्रेस व विरोधकांचे संख्याबळ कमी होणे
विरोधी पक्षनेतेपदाचे गणित धोक्यात येणे
११ वर्षे सत्तेत असूनही भाजपला दुसऱ्या पक्षातील लोक फोडावे लागतात. याचा अर्थ भाजपच्या कारखान्यातून तयार होणारा माल टिकाऊ नाही तर टाकाऊ आहे. कर्तृत्व, विकासाच्या मुद्द्यावर भाजप अजूनही लोकांना उभे करू शकलेली नाही.
- विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते