Local Body Election : विखे-पाटलांनी गड राखला! अहिल्यानगरच्या राहतामध्ये भाजपचा नगराध्यक्ष
Saam TV December 22, 2025 06:45 AM
  • राहाता नगरपरिषदेत भाजपचा विजय

  • २० पैकी १९ जागांवर भाजपचे नगरसेवक विजयी

  • राहाता नगरपरिषदेत डॉ. स्वाधिन गाडेकर यांचा विजय

  • अहिल्यानगर जिल्ह्यात भाजपची निवडणूक वर्चस्व

राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून अहिल्यानगरमधील राहता येथे विखे पाटलांनी गड राखला आहे. तसेच भाजप महायुतीचा दणदणीत विजय झालेला पाहायला मिळतो आहे. २० पैकी १९ नगरसेवक विजयी झाले असून नगराध्यक्षपदासाठी डॉ. स्वाधिन गाडेकरांनी बाजी मारली आहे.

आज राज्यातील २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होत आहे. सकाळी १० वाजल्या पासून मतमोजणीला सुरूवात झाली आहे. सर्वत्र भाजपला यश मिळताना पाहायला मिळत आहे. नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठीचे मतदान २ डिसेंबर रोजी पार पडले. त्याचा आज निकाल लागला असून अहिल्यानगरच्या राहता येथे भाजपचा दणदणीत विजय झाला आहे.

Mumbai : ठाण्याहून CSMT चा प्रवास सुसाट होणार, महत्त्वाचा उड्डाणपूल BMC बांधणार, वाचा कसा असेल नवा मार्ग

२० पैकी १९ नगरसेवक विजयी झाले आहेत. दरम्यान राहात्याच्या नगराध्यक्षपदाची विजयी माळ भाजपचे डॉ. स्वाधीन गाडेकर यांच्या पारड्यात पडली आहे. राहताच्या नगराध्यक्षपदासाठी विखे पाटील गटाचे डॉ. स्वाधिन गाडेकर आणि लोकक्रांती सेनेचे धनंजय गाडेकर यांच्यात मुख्य लढत पाहायला मिळाली. दोन्ही उमेदवारांनी प्रचारात मोठी ताकद लावली होती. या चुरशीच्या लढतीत डॉ. स्वाधिन गाडेकरांनी बाजी मारली आहे. या विजयानंतर अहिल्यानगरमध्ये जल्लोष केला जात आहे.

Kolhapur : दबक्या पावलाने आले अन् कुटुंबासह कुत्र्यावर फवारलं गुंगीचं औषध, कोल्हापूरमध्ये चोरट्यांनी लाखोंवर हात साफ केला अहिल्यानगरमध्ये एकूण नगरपरिषदा किती?
  • शेवगाव- 24+1 (सदस्य + नगराध्यक्ष )

  • पाथर्डी- 20+1

  • श्रीगोंदा- 22+1

  • जामखेड- 24+1

  • कोपरगाव - 30+1

  • श्रीरामपूर- 34+1

  • राहुरी- 24+1

  • नेवासा ( नगरपंचायत ) -17+1

  • देवळाली प्रवरा-21+1

  • संगमनेर-30+1

  • शिर्डी- 23+1

  • राहाता-20+1

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.