मंचर : मंचर नगरपंचायत नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत दुसऱ्या फेरीअखेर शिवसेनेच्या उमेदवार राजश्री दत्ता गांजाळे आघाडीवर आहेत. त्यांना २ हजार ४४८ मते मिळाली आहेत. अपक्ष उमेदवार प्राची आकाश थोरात यांना २ हजार ६७ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या मोनिका सुनील बाणखेले यांना २ हजार २३० मते मिळाली आहेत.
अद्याप एक फेरी मतमोजणीचे निकाल येणे बाकी असून, सध्या शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व अपक्षयांच्यात अटीतटीची लढत सुरू आहे. दरम्यान, १७ नगरसेवकांच्या निवडणुकीत वसंत बाणखेले (उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना), उर्मिला प्रवीण मोरडे, संदीप उर्फ लक्ष्मण थोरात, इब्रान मीर, माणिक संतोष गावडे (राष्ट्रवादी काँग्रेस),विकास जाधव (शिवसेना),शिवाजीराव राजगुरू सोनाली विकास बाणखेलेव विशाल आवळे (दोघे अपक्ष),तसेच अंजली बाणखेले (शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस) हे उमेदवार विजयी झाले आहेत.
ज्योती बाणखेले (भाजप) व लखन पारधी (शिवसेना) यांना समान मते मिळाल्याने त्यांचा निकाल राखून ठेवण्यात आला आहे. दरम्यान, निवडणूक मतमोजणी केंद्रामध्ये पत्रकारांना प्रवेश नाकारण्यात आल्याने सर्व पत्रकारांनी निवडणूक प्रक्रियेबाबत तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे.
विशेष म्हणजे, पत्रकार कक्षामध्ये पिण्याच्या पाण्याची कोणतीही योग्य व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. ठेवलेल्या पाण्याच्या जारमधून कुत्रे पाणी पीत असल्याची छायाचित्रे काही पत्रकारांनी टिपली आहेत.
Maharashtra Nagar Parishad-Nagar Panchayat Election Result 2025 Live: यवतमाळमध्ये भाजपला धक्का, नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत मोठ्या नेत्याच्या पत्नीचा पराभवतसेच पत्रकार कक्ष स्वच्छतागृहाच्या बाहेर उभारण्यात आल्याने दुर्गंधीचा मोठा त्रास पत्रकारांना सहन करावा लागला. एकूणच निवडणूक अधिकाऱ्यांच्या नियोजनाबाबत पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी असून, या सर्व बाबींची थेट तक्रार निवडणूक आयोगाकडे करण्याचा निर्णय सर्व पत्रकारांनी घेतला आहे मंचरता आंबेगाव निवडणूक मतमोजणीसाठी सहभागी झालेले प्रतिनिधी