मराठी अभिनेत्री वल्लरी विराजच्या हाताला दुखापत झाली आहे.
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून वल्लरीला खूप लोकप्रियता मिळाली.
वल्लरीने हाताला दुखापत झाली असतानाही सुंदर डान्स केला आहे.
'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहचलेली अभिनेत्री वल्लरी विराज आता नवीन मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यामुळे चाहते खूप खुश आहे. वल्लरी सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या लूकचे फोटो, कामाचे अपडेट आणि भन्नाट डान्स रील शेअर करत असते. तिच्या डान्स रील चाहत्यांना कायम खूप आवडतात.
View this post on Instagram
अशात आता वल्लरीने आणखी एक सुंदर डान्स रील शेअर केली आहे. ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. व्हिडीओत वल्लरी इमरान हाश्मीच्या Pee Loon गाण्यावर सुंदर डान्स करताना दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव खूपच भारी आहेत. ती आपल्या डान्सने कायम प्रेक्षकांना आपलस करते. मात्र व्हिडीओत अभिनेत्रीच्या हाताला फ्रॅक्चरबँडेज बांधलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे चाहते चिंता व्यक्त करताना दिसत आहे.
हाताला दुखापत झाली असूनही वल्लरीखूप छान पद्धतीने डान्स करत आहे. तिने व्हिडीओला "In sickness and in health" असे कॅप्शन लिहिलं आहे. तिच्या या व्हिडीओवर चाहते चिंता व्यक्त करताना दिसत आहे. "काळजी घ्या", "क्युट डान्स", "तुझ्या हाताला काय झाल?", "भन्नाट हावभाव" अशा कमेंट्स येत आहेत. मात्र अद्याप वल्लरीच्या हाताला नेमकी दुखापत कशामुळे झाली, याची माहिती समोर आली नाही.
View this post on Instagram
वल्लरी विराजच्या नवीन मालिकेचे नाव 'शुभ श्रावणी' असे आहे. ही मालिका जानेवारी महिन्यापासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत मराठी अभिनेता लोकेश गुप्ते 9 वर्षांनी मालिकाविश्वात कमबॅक करत आहे. मालिका पाहण्यासाठी प्रेक्षक खूप उत्सुक आहेत.
Sachin Pilgaonkar : 'ही डान्स स्टेप अक्षय खन्नाला सचिनजीनी शिकवली'; 'धुरंधर'च्या गाण्यावर सचिन-सुप्रिया थिरकले, नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली