बायको घरी नसताता आणायचा मुली… स्वतःला नीच म्हणवणाऱ्या अभिनेत्याने तरुणीचं अपहण केलं आणि…
admin December 22, 2025 12:49 PM
[ad_1]

झगमगत्या विश्वातील सेलिब्रिटी कायम स्वतःचं आयुष्य खासगी ठेवतात… पण असे देखील अनेक सेलिब्रिटी आहेत. जे भूतकाळात केलेल्या चुका सांगण्याची हिंमत ठेवतात. अशाच अभिनेत्यांपैकी एकाने स्वतःच्या आयुष्याचं वास्तव सांगितलं. दारूमुळे त्याने आयुष्यातील जवळपास दोन दशक उद्ध्वस्त केली. शिवाय बायको देखील त्याने फसवणूक केलं. यावेळी अभिनेत्याने धक्कादायक सत्य सांगितलं ते म्हणजे, लग्नासाठी अभिनेत्याने तरुणीचं अपहरण केलं… अशात हा अभिनेता कोण असेल? असा प्रश्न देखील तुम्हाला पडला असेल…

सध्या ज्या अभिनेत्याच्या खासगी आयुष्याची चर्चा रंगली आहे, तो अभिनेता दुसरा तिसरा कोणी नाही तर, अभिनेता आणि गायक पियुष मिश्रा आहे… पियुष याने जवळपास 1980 ते 2005 पर्यंत दारुचं मोठ्या प्रमाणात सेवन केलं… नुकताच झालेल्या एका मुलाखतीत अभिनेत्यानेत स्वतःच्या खासगी आयुष्याबद्दल मोठा खुलासा केला आहे. पियुष याच्या पत्नीचं नाव प्रिया आहे. लग्नासाठी अभिनेत्याने प्रियाचं अपहरण केलं होतं.

पियुष म्हणाला, ‘खरी समस्या अशी होती की मी एक घाणेरडा, नीच आणि नैतिकदृष्ट्या भ्रष्ट व्यक्ती होतो. प्रिया हिने सर्वकाही मोठ्या धैर्याने पाहिलं आणि 2006 मध्ये उपचारासाठी मला एका संस्थेत घेऊन गेली… मला माझ्या पत्नीची देखील काळजी नव्हती आणिम माझ्या मुलाची देखील नाही…. आज विचार करुन मला रडायला येतं की मी माझ्या आई आणि पत्नीसोबत किती वाईट वर्तन केलं आहे.’

पियुष याने सांगितल्यानुसार, २०१० मध्ये अभिनेत्याच्या पत्नीने त्याला इगतपुरी येथील विपश्यनेला पाठवण्याचा निर्णय घेतल्याने त्याच्या आत्म्याला खूप शांती मिळाली. अभिनेता म्हणाला, ‘सुरुवातीला मला त्रास झाला. पण माझ्या मनात अपराधाची भावना आली… त्यानंतर मी सर्वांची माफी देखील मागितली…’

पत्नीला देखील खूप त्रास दिला… यावर देखील अभिनेत्याने खंत व्यक्त केली. ‘पत्नी घरी नसताना मी दुसऱ्या मुलींना घरी आणायचो… हे मी पत्नीला सांगितलं… माझी अशी वागणूक तिच्यासाठी प्रचंड कठीण झाली होती. पण तिच्यापासून मी काही लपवलं नाही… पण आता मला चांगलं वाटत आहे… माझी पत्नी खूप सहनशील आहे आणि आता तिला सगळं कळतंय. ‘

पियुष मिश्रा याच्याबद्दल सांगायचं झालं तर, ‘गँग्स ऑफ वासेपुर’, ‘मकबूल’, ‘तमाशा’ आणि ‘इंडियन 2’ यांसारख्या सिनेमांमध्ये अभिनेत्याने काम केलं आहे. “ब्लॅक फ्रायडे” आणि “गँग्स ऑफ वासेपूर” सारख्या चित्रपटांमधील त्यांच्या गाण्यांमुळे त्यांना गीतकार म्हणून ओळख मिळाली.


[ad_2]
Source link
© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.