मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडला सर्वात मोठा झटका, कोर्टाने थेट..
Tv9 Marathi December 22, 2025 07:45 PM

बीडच्या मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर एकच खळबळ उडाली. काही धक्कादायक फोटोही व्हायरल झाली. या हत्येनंतर बीड जिल्हा प्रचंड चर्चेत आला. बीडच्या मारहाणीचे अनेक व्हिडीओ व्हायरल झाली. बीड बिहार झाल्याचेही आरोप यादरम्यान करण्यात आली. संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने धनंजय मुंडे यांच्यावरही आरोप करण्यात आली. फक्त आरोपच नाही तर धनंजय मुंडे यांना मंत्रिपदाच्या राजीनाम्यासाठी दबाव टाकण्यात आला. अखेर आपल्या आरोग्याचे कारण देत धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला. थेट मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर काही आरोपही केली. नुकताच नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल लागला असून धनंजय मुंडे यांनी या निकालानंतर म्हटले की, जनतेच्या न्यायालयात मी विजयी झालो.

यादरम्यान प्रचारावेळी धनंजय मुंडे यांनी वाल्मिक कराड यांचीही आठवण काढली. वाल्मिक कराड सध्या बीडच्या जेलमध्ये संतोष देशमुख प्रकरणात आहे. नुकताच आता मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराडया जामीन फेटाळून लावला आहे. वाल्मिक कराडने जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, हा जामीन फेटाळण्यात आला. हा एक अत्यंत मोठा धक्का वाल्मिक कराडला म्हणावा लागेल.

वाल्मिक कराडचा खंडणी, संतोष देशमुख यांचे अपहरण आणि खुनामध्ये सर्व पुराव्यांवरून सहभाग दिसत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने म्हटले असून जामीन फेटाळला आहे. संतोष देशमुख खून प्रकरणात वाल्मिक कराड याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जामिनासाठी अर्ज केला होता. मात्र, न्यायालयाने महत्त्वपूर्ण निष्कर्ष नोंदवत आरोपी वाल्मिक कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

यामध्ये दिलेल्या निकालात वाल्मिक कराड याचा खंडणी त्यानंतर सरपंच संतोष देशमुख यांचे केलेले अपहरण आणि हत्या यामध्ये कॉल डेटा रेकॉर्ड, मोबाईल वरील संभाषण, कराड आणि इतर आरोपींमधील सततचा संवाद, जप्त केलेल्या व्हिडिओ क्लिप्स, आवाजाच्या नमुन्यांच्या सत्यतेची पुष्टी, प्रयोग शाळेतील अहवाल या पुराच्यांच्या आधारे सहभाग असल्याचे दिसत असल्याने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जामीन अर्ज फेटाळला आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.