बिग बॉस मराठी सीझन 5 चा विजेता सुरज चव्हाण (Suraj Chavan) आता संसारी गृहस्थ झालाय. गेल्याच महिन्यात थाटामाटात त्याचा विवाह झाला आणि संजना चव्हाण त्याच्या आयुष्याची जोडीदार बनली. मात्र लग्नापूर्वीत सुरजने आणखी एक गुड न्यूज चाहत्यांसोबत शेअर केली होती, ती म्हणजे त्याच्या नव्या घराची. दोन पत्र्यांची खोली ते आलिशान बंगला, असा सूरजचा प्रवास खूप गाजला. त्याचं नवकोरं घर बांधून झाल्यावर सुरजने गृहप्रवेशाचे फोटो, व्हिडीओ शेअर केले होते. एवढंच नव्हे तर घर बांधून देण्याचं आश्वासन देणारे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar यांच्यांसाठी सुरजने खास मेसेज लिहीत त्यांचे आभार मानले होते.
त्याच्या घराचे फोटो, व्हिडीओ यावर चाहत्यांचे बरेच, लाइक्स कमेंट्स तर आल्याच, पण आज तुझे आई-वडील असते तर त्यांना खूप आनंद झाला असता असं म्हणत चाहत्यांनी भावूक मेसेजही केला होता. सध्या सुरज याचं आलिशान घरात पत्नी संजनासोबत रहात असून तिथले अनेक फोटोही तो शेअर करत असतो. पण त्याच्या या घराचं, मोठ्ठ्या बंगल्याचं नाव काय आहे माहीत आहे का ?
दोघांमुळे पूर्ण झालं घराचं स्वप्न
बारामती तालुक्यात मोढवे गावात राहणारा सुरज बिग बॉस पासून चर्चेत आला. तिथे अनेकदा तो त्याच्या घराच्या स्वप्नाबद्दल सांगायचा. बिग बॉस मराठीचा 5 वा सीझन जिंकल्यावर त्याचं खूप कौतुक झालं. बारामतीतल्या सुरजने उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली तेव्हा घराचा विषय निघाला होता. तेव्हाच अजित दादांनी त्याला एकदम चांगलं घरं बांधून देण्याची घोषणा केली होती. त्या आश्वासनाल जागत सूरजचं मोठ घरं, आलिशान बंगला तयार झाला. म्हणूनच गृहप्रवेसाचा व्हिडीओ टाकताना सुरज याने अजित पवारांचा नाव मेन्शन करत त्यांचे आभार मानले होते.
Suraj Chavan : ‘सुरज, तुला…’ सूरज चव्हाण याच्या गृहप्रवेशाच्या व्हिडीओवर अजित पवारांची खास कमेंट
सुरजच्या नव्या घरात मॉड्युलर किचन, हाय सिलिंग आणि आकर्षक लायटिंग आली आहे. घरात अद्ययावत सुविधाही आहेत, त्याचे बरेच फोटो व्हायरल होत असतात. आता त्यातच आणखी एका फोटोची भर पडली आहे, ती म्हणजे सूरजच्या घराच्या नेमप्लेटच्या फोटोची.त्याच्या घरावर लावलेल्या नेमप्लेटने सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. सूरजचं घर पूर्ण होण्यात बिग बॉस आणि अजित दादा यांची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे त्याच्या घराला तो काय नाव देतो, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. आता अखेर त्याच्या घराचं नाव समोर आलं आहे.
View this post on Instagram
A post shared by Suraj Chavan (@official_suraj_chavan1151)
सूरजच्या बंगल्याला कोणाचं नाव ? नेमप्लेटने वेधलं लक्ष

मात्र त्याच्या घरावर या दोघांचीही नावं नाहीत, तर एक वेगळंच नाव आहे. सूरजनं त्याच्या या स्वप्नातल्या घराला ‘आई आप्पांची पुण्याई’ असं नाव दिलं आहे. बिग बॉस मराठीच्या घरात असतानाही तो अनेकवेळा आई-वडिलांबाबत बोलला होता. त्याने लहानपणीच आई-वडील गमावले, त्यामुळे त्याचं बालपण खूप गरिबीत, हलाखीच्या परिस्थितीत गेलं होतं. पण सुरजचं त्याच्या आई-वडिलांवर निस्सीम प्रेम आहे. त्यामुळे बंगल्याला त्यांचं नाव देत आणि नेमप्लेटवरही आई-वडिलांना स्था देते सुरजने त्याच्या मात्या-पित्यांना एक प्रकारे आदरांजली वाहिली आहे. तसेच बंगल्याच्या बाहेर त्याने आणखी एक नेमप्लट लावली असून तिथेही आई-अप्पांची पुण्याई असं वर लिहीलं असून त्याखाली श्री. सुरज चव्हाण आणि सौ. संजना चव्हाण अशी नावं लिहीलेली दिसत आहेत.