Allu Arjun Deepika Padukone first collaboration: हिंदी मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पादुकोन ही काही न काही कारणामुळे चर्चेत असते. गेल्या काही दिवसापासून ती 8 तास शिफ्त कामाच्या अटीमुळे चर्चेत होती. त्यानंतर तिला अनेकांनी ट्रोल केलं. काहींनी तिच्या अटीचं समर्थन केलं तर काहींना तिच्या विरुद्ध प्रतिक्रियाही दिली.
दरम्यान दक्षिण आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील दोन मोठी नावे एकाच चित्रपटात झळकण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अल्लू अर्जुनच्या आगामी बिग-बजेट साय-फाय अॅक्शन चित्रपटात दीपिका पदुकोण प्रमुख भूमिकेत दिसणार असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. या प्रकल्पाची अधिकृत घोषणा झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत उत्सुकता वाढली असून, दीपिका-अल्लू अर्जुन यांची जोडी प्रेक्षकांना पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे.
'जवान'सारख्या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारा एटली या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे. या चित्रपटाला सध्या 'एए२२एक्सए६' असे वर्किंग टायटल देण्यात आले आहे. चित्रपटाचे सुमारे ६० टक्के शूटिंग पूर्ण झाले असून, काही महत्त्वाचे सीन्स आणि पोस्ट-प्रोडक्शनचे काम अजूनही बाकी आहे. पहिला भाग २०२६ च्या उत्तरार्धात प्रदर्शित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
View this post on Instagram
अल्लू अर्जुनसोबत दीपिका पदुकोण व्यतिरिक्त मृणाल ठाकूर आणि रश्मिका मंदाना यांच्याही भूमिकांबाबत चर्चा सुरू आहेत. अल्लू अर्जुनला नुकतेच 'पुष्पा २' मधील भूमिकेसाठी मोठा प्रतिसाद मिळाला होता, तर दीपिका पदुकोण विविध आंतरराष्ट्रीय आणि सातत्याने चर्चेत आहे.
'माझी वडिलांशी तुलना करू नका' लक्ष्मीकांत बेर्डेंबद्दल बोलताना अभिनय म्हणाला... 'त्याची उणीव...'