आटपाडी : आटपाडी नगरपंचायतीच्या पहिल्याच ऐतिहासिक निवडणुकीत भाजपचा नगराध्यक्ष झाला, तर शिवसेनेचे सर्वाधिक आठ नगरसेवक निवडून आले. भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार यू. टी. जाधव यांनी ११५४ मतांनी विजय मिळविला.
शिवसेनेला सर्वाधिक आठ, भाजपला सात, राष्ट्रवादी काँग्रेसला एक आणि तीर्थक्षेत्र संयुक्त विकास आघाडीला एका जागेवर विजय मिळाला. आमदार गोपीचंद पडळकर, अमरसिंह देशमुख यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या निवडणुकीत भाजपने बाजी मारली, तर तानाजीराव पाटील यांच्या नेतृत्वातील शिवसेनेला अनपेक्षित पराभवाचा धक्का बसला.
Atpadi Nagaradhyaksh Result: आटपाडीत शिवसेनेचे सर्वाधिक नगरसेवक, पण नगराध्यक्षपद भाजपकडे; पडळकरांचा दे धक्काभाजपचे यू. टी. जाधव हे नगराध्यक्षपदी विजयी झाले. ते शिक्षक होते. पदाचा राजीनामा देऊन त्यांनी निवडणूक लढवली. सुरुवातीला टपाली मतांची मोजणी केली. त्यानंतर १४ टेबलांवर १ ते १४ प्रभागांची मतमोजणी सुरू झाली. प्रत्येक प्रभागाचा एकेक निकाल बाहेर पडला.
सुरुवातीला भाजप, शिवसेनेत चुरस होती. प्रभाग क्र. १ ते ५ मध्ये शिवसेनेचे नगरसेवक निवडून आले, तर सहा, सात, दहा, अकरा, बारा, तेरा व पंधरामध्ये भाजपाचे नगरसेवक निवडून आले. तीर्थक्षेत्र संयुक्त आघाडीच्या प्रभाग १७ मध्ये मनीषा पाटील, तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांच्या पत्नी संध्या पाटील या विजयी झाल्या.
Sangli Election Result : आष्ट्यात शिंदेशाहीच कायम; २४ पैकी २३ जागांवर शहर विकास आघाडीचा दणदणीत विजय१७ नगरसेवकांपैकी शिवसेनेचे आठ, भाजपाचे सात, राष्ट्रवादी काँग्रेस एक आणि तीर्थक्षेत्र आघाडीचा एक नगरसेवक निवडून आला. नगराध्यक्षपदाच्या मतमोजणीत अपवाद वगळता प्रत्येक प्रभागातून भाजपाचे यू. टी. जाधव मताधिक्य घेत गेले.
पहिल्या १३ प्रभागांत ७०० वर त्यांनी मताधिक्य घेतले होते. सर्व प्रभागांची मतमोजणी पूर्ण झाल्यावर ११५४ मतांनी विजय घोषित केले. शिवसेनेचे रावसाहेब सागर तर तीर्थक्षेत्र संयुक्त आघाडीचे सौरभ पाटील यांना मते मिळाली.
शिवसेनेला येथे पराभवाचा जबर धक्का बसला. शिवसेनेचे आमदार सुहास बाबर यांच्या मतदारसंघातील नगरपंचायतीवर भाजपाने झेंडा फडकवण्यात यश मिळवले.आमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख यांच्या रणनीतीमुळे नगरपंचायतीवर भाजपाचा झेंडा फडकला. या निवडणुकीत फारशी चुरस नव्हती.
जाधव यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहीर केल्यावर, आमदार गोपीचंद पडळकर व अमरसिंह देशमुख एकत्रित आल्यावर रंगत वाढली. शिवसेनेच्या तानाजीराव पाटील यांना आपल्या नेतृत्वाखाली शिवसेनेची सत्ता स्थापन करण्यात अपयश आले.
माजी आमदार राजेंद्र देशमुख, भारत पाटील, आनंदराव पाटील यांच्या नेतृत्वाखाली लढलेल्या तीर्थक्षेत्र आघाडीचा एक नगरसेवक निवडून आला. कुणबी प्रवर्गामधून नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी दाखल केलेल्या सौरभ पाटील यांनी कडवी झुंज दिली.
भाजप कार्यकर्त्यांनी विजयानंतर शहरात गुलालाची उधळण करत, फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला. आटपाडी नगरपंचायत पक्षीय बलाबल शिवसेना - ८ भाजप - ७ राष्ट्रवादी काँग्रेस - १ तीर्थक्षेत्र विकास आघाडी - १