कोल्हापूर : ‘आमचा पक्ष इंडिया आघाडीतील एक महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी आम्ही २१ जागांची मागणी जिल्ह्यातील आघाडीचे प्रमुख आमदार सतेज पाटील यांच्याकडे केली आहे.
त्याबाबतचा आणि आमच्या पक्षाकडून इच्छुक असणाऱ्या आणि मुलाखत दिलेल्या उमेदवारांची नावे असलेला अहवाल प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, पश्चिम महाराष्ट्राचे पक्ष निरीक्षक जयंत पाटील यांच्याकडे पाठविला असल्याचे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी आज सांगितले.
Kolhpur Muncipal corporation : इंडिया आघाडीच्या झेंड्याखाली महापालिका रणधुमाळी; कोल्हापुरात विरोधक एकवटले‘महानगरपालिकेच्या प्रत्येक प्रभागात एक उमेदवार ‘राष्ट्रवादी’चा पाहिजे, अशी आमची पहिल्यापासूनची आग्रही भूमिका आहे. येत्या दोन दिवसांमध्ये आमदार पाटील, शिवसेनेचे (ठाकरे गट) विजय देवणे, संजय पवार, सुनील मोदी यांच्यासमवेत आमची बैठक होईल.
त्यात जागा वाटप निश्चित केले जाईल. या बैठकीनंतरच पक्षाकडून उमेदवारी अर्ज देण्यात येणार असल्याचे शहराध्यक्ष आर. के. पोवार आणि ॲड. अनिल घाटगे यांनी सांगितले.
Kolhapur Municipal : ‘कट्टर शिवसैनिक आहे, उमेदवारी द्या’ ठाकरे सेनेतील इच्छुकांची मुलाखतीत ठाम भूमिका