दरवर्षी 25 डिसेंबर रोजी भारतासह जगभरात नाताळ सण मोठ्या आनंदात साजरा केला जातो. नाताळ हा ख्रिश्चन समुदायासाठी सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सण आहे. पण आजच्या युगात ख्रिश्चन धर्मासोबतच इतर धर्माचे लोकही नाताळ हा सण साजरा करताना दिसतात. नाताळ सण जवळ येताव बाजारामध्ये त्यानुसार सजावट केली जाते. अनेक दुकानांमध्ये नाताळ स्पेशल ऑफर देखील असतात. त्या बरीच लोकं नाताळ सणानिमित्त घरात नाताळ स्पेशल झाडे देखील लावतात. एवढेच नाहीतर नाताळच्या दिवशी आपल्या जवळच्या व्यक्तीला तसेच घरातील व्यक्तींना भेटवस्तू देण्याची जुनी परंपरा आहे.
नाताळच्या या खास प्रसंगी कुटुंब आणि मित्रांना भेटवस्तू दिल्या जातात. या सणाने सर्वांच्या आयुष्यात आनंद आणावा अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. तथापि लोकं अनेकदा नाताळाच्या दिवशी भेटवस्तूंबद्दल साशंक असतात. म्हणून जर तुमचा मित्र ख्रिश्चन असेल तर नाताळाच्या दिवशी त्यांना या वस्तू भेटवस्तू देऊ नका. असे मानले जाते की नाताळाच्या दिवशी या वस्तू दिल्याने समस्या उद्भवू शकतात. चला तर मग याबद्दल आजच्या लेखात जाणून घेऊयात.
नाताळात या वस्तू भेट देऊ नकावास्तुशास्त्रानुसार नाताळाच्या दिवशी देवाच्या मूर्ती भेट देऊ नका.
नाताळच्या दिवशी कात्री, चाकू, तलवारी किंवा ज्वलनशील वस्तू सारख्या धारदार वस्तू भेट म्हणून देऊ नका. असे केल्याने नातेसंबंध बिघडू शकतात.
नाताळच्या पूर्वसंध्येला कोणालाही रुमाल किंवा पेन भेट देऊ नका. या वस्तूंचा प्राप्तकर्त्यावर आणि तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
व्यवसायाशी संबंधित कधीही काहीही कोणाला भेट म्हणून देऊ नका. असे केल्याने तुम्ही ज्याला भेट देता त्याला व्यवसायात नुकसान होऊ शकते.
वास्तुशास्त्रानुसार मत्स्यालय, धबधबे किंवा कासव यासारखे फोटो असलेल्या फ्रेमची वस्तू भेट देऊ नका. यामुळे आर्थिक समस्या उद्भवू शकतात. तसेच, या दिवशी काटेरी झाडे भेट देऊ नका.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)