सध्याचे युग हे डिजिटल आहे. प्रत्येकजण हातातील मोबाईलवर सगळी कामे करतो. बँकिंगचे काम असो किंवा अन्य काही, ही सगळीक कामे तुम्हाला इंटरनेटच्या मदतीने करता येतात. आज तुमच्या मोबाईलध्ये अनेक अॅप्स आहेत. या प्रत्येक अॅपला एक पासवर्ड असतो.
यासह एखादे संकेतस्थळ असते जिथे तुम्हाला तुमचे खाते खोलावे लागते. अशा स्थितीत खाते खोलण्यासाठी तुम्हाला पासवर्ड टाकावा लागतो. हा पासवर्ड कठीण असेल तर भविष्यात तुम्हाला कोणतीही अडचण येत नाही. पण सोपा पासवर्ड ठेवला तर तुमचे अकाऊंट हॅक होण्याची शक्यता असते.
या जगात असे काही पासवर्ड आहेत जे सगळीकडेच वापरले जातात. विशेष म्हणजे हे पासवर्ड लवकर स्मरणात राहतात. त्यामुळेच अनेकजण हेच सोपे पासवर्ड ठेवतात. पण अशा प्रकारचे सोपे पासवर्ड वापरणे टाळले पाहिजे. कारण या पासवर्डच्या मदतीने कोणीही तुमचा फोन, तुमचे सोशल मीडिया खाते किंवा अन्य बाबी लवकर उघडू शकतो.
तज्ज्ञांच्या मते 123456 या कॉमन पासवर्डसह 1234, 12345, 0000 अशा प्रकारचे पासवर्ड ठेवण्याचेही प्रमाण बरेच आहे. त्यामुळे असे साधे सरळ पासवर्ड न ठेवता तो किचकट असावा. कोणीही तुमचे खाते हॅक करू शकणार नाही, असा पासवर्ड असावा, असे सांगण्यात येते.