बांग्लादेश पुन्हा एकदा वैचारिक आगीमध्ये होरपळतोय. रस्त्यावर चिथावणीखोर घोषणा, मिडिया संस्थांवर हल्ले आणि लोकशाही आवाज दाबण्याचा प्रयत्न हे सर्व तिकडे सुरु आहे. उस्मान हादीच्या मृत्यूनंतर अचानक हिंसाचाराचा उद्रेक झालाय. त्यामुळे बांग्लादेशात हे सर्व घडतय असं नाहीय. हा कट्टरपंथीयांच्या विचारपूर्वक केलेल्या प्लानिंगचा भाग आहे. नव्या हिंसाचारामागे भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या हादीचे विचार असल्याचं सांगितलं जातय. आता हादी या जगामध्ये नाहीय. अवामी लागीच्या एका नेत्याने व्हिडिओ जारी करुन खुलासा केला आहे. यात एका दंगलखोराने मी उस्माम हादीच्या मार्गदर्शनाखाली काम करतोय याची कबुली दिली आहे. त्याने दाखवलेल्या मार्गावरुन चालतोय. हिंदू मुलगा दीपू दासची हत्या असो किंवा मिडिया संस्थांवर हल्ले, या दोन्ही घटनांवरुन उस्मान हादीच्या मृत्यूनंतरही त्याचे विचार अजूनही किती धोकादायक आहेत, ते स्पष्ट झालय.
बांग्लादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या पक्षाचे नेते मोहम्मद अली अराफात यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक पोस्ट केली आहे. सोबत एक व्हिडिओ सुद्धा रिलीज केलाय. त्यात उस्मान हादीच्या समर्थकाने जोशमध्ये येऊन आपला पूर्ण प्लान सांगून टाकला. मोहम्मद अली अराफात यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलय की, “व्हिडिओमध्ये तुम्ही या कट्टरपंथी इस्लामिस्टची टिप्पणी ऐका. 5 ऑगस्टनंतर प्रोथोम आलो आणि डेली स्टारच्या ऑफिसमध्ये आग लावण्यास असमर्थ ठरल्याबद्दल त्याने खेद व्यक्त केला. त्यानंतर तो गर्वाने दावा करतो की, त्याने आणि त्याच्या दोन माणसांनी उस्मान हादीच्या मार्गदर्शनाखाली काम केलं” मीडिया ऑफिसेसमध्ये आग लावल्यानंतर ते उरलेला भाग नष्ट करण्यासाठी धनमंडी 32 मध्ये बंगबंधु यांच्या घराच्या दिशेने गेले. या कृत्यांमधून कट्टरपंथी विचारधारा दिसून येते. हिंसेच्या माध्यमातून त्यांना स्वत:ला समाजावर लादायचं आहे. अशा शक्तींच्या वर्चस्वाखाली स्वतंत्र आणि लोकशाहीवादी समाज विकसित होऊ शकत नाही.
शेख हसीना यांना समजून घेण्यात कमी पडले
शेख हसीना यांनी इकोनॉमिक डेवलपमेंटच्या माध्यमातून जीवनमानाचा स्तर उंचावला आणि अशा कट्टरतवादाला रोखण्याचा प्रयत्न केला. अनेक पाश्चिमात्य विश्लेषक त्यांची लीडरशीप आणि हेतूंचं योग्य आकलन करु शकले नाहीत असं मोहम्मद अली अराफात यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिलय. कट्टरपंथी इस्लामिक शक्तींनी शेख हसीना यांच्या सरकारविरोधात हिंसाचार केला. अनेक एक्सपर्ट ही गोष्ट समजून घेण्यात अपयशी ठरले की, हा एक फुल स्केल विद्रोह होता. 5 ऑगस्ट 2024 च्या घटनेनंतर यूनुस यांच्या नेतृत्वाखाली त्याच शक्ती पुन्हा Active करण्यात आल्या आणि त्याचे परिणाम आता स्पष्ट दिसतायत.
उद्देश फक्त प्रॉपर्टीचं नुकसान करणं नाही
जसं की, उस्माम हादीच्या समर्थकाने सांगितलं की, तो हादीने दाखवलेल्या मार्गावरुन चालतोय. त्यातून दंग्याचा पॅटर्न स्पष्ट होतो. सर्वात आधी स्वतंत्र मीडिया संस्थांना लक्ष्य करण्यात आलं. कारण ते प्रश्न विचारतात. सरकार आणि कट्टरतेला आरसा दाखवतात. मीडिया संस्थांवरील हल्ल्याचा उद्देश फक्त प्रॉपर्टीचं नुकसान करणं नाही, तर बातम्या रोखायच्या आणि भितीचं वातावरण निर्माण करायचं हा त्यामागे उद्देश आहे. अराफात यांनी पोस्टमध्ये लिहिलय की, मीडिया संस्थांवरील हल्ल्यानंतर दंगलखोर बंगबंधु यांच्या घराच्या दिशेने गेले. यातून दिसतं टार्गेट फक्त प्रतिकात्मक नाही, तर लोकशाहीवर हा थेट्ट हल्ला आहे.
समाजावर एक विचार लादण्याचा इरादा
बांग्लादेशी विद्यार्थी लीडर उस्मान हादीच्या विचाराचा संदर्भ इथे महत्वाचा आहे. कारण या विचारात बुहलवादाला प्रवेश नाहीय. या हिंसेमागे समाजावर एक विचार लादण्याचा इरादा आहे. विचारधारेशी मतभिन्नतेला गद्दारी मानलं जातं. प्रश्न विचारणाऱ्यांना शत्रू मानतात. याचमुळे मीडिया संस्थांवर पहिला हल्ला केला. दंगलीत एका रणनितीअंतर्गत मीडिया कार्यालयांची निवड करण्यात आली. जेणेकरुन भय आणि अराजकतेमध्ये त्यांचा आवाज दडपला जाईल.
मूक संमती दिली
सोशल मीडियावर शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये दंगलखोर सांगतो की, तो जेव्हा मीडिया संस्थेला आग लावत होता, तेव्हा आर्मीने त्याला रोखण्याऐवजी मूक संमती दिली. त्याने सांगितलं की, जेव्हा ते प्रोथोम आलोला आग लावण्यासाठी पोहोचले, तेव्हा तिथे आर्मी सुद्धा आली. पण आर्मीने त्यांना थांबवलं नाही. कारण त्यांनी आधीच सांगितलेलं की, जो कोणी रोखण्याचा प्रयत्न करेल, त्याला आगीत टाकणार. ते आर्मीच्या जवानांना सलाम करतात. कारण आर्मीने त्यांना जाळपोळ करण्यापासून नाही रोखलं.
भारतासोबतचे राजनैतिक संबंध संपवून टाका
त्यानंतर दंगलखोर आणखी एक धमकी देतो आणि बोलतो बांग्लादेशात डेली स्टार समाप्त झालाय. प्रोथोम आलो सुद्धा संपलाय. आम्ही थांबणार नाही. ज्यांनी उस्मान हादीला मारलय आणि शेख हसीना या सगळ्यांना बांग्लादेशकडे सोपवा. जो पर्यंत हे होत नाही, तो पर्यंत भारतासोबतचे राजनैतिक संबंध संपवून टाका असं या दंगलखोराने म्हटलय.
….तर हालात अजून खराब होतील
आता प्रश्न येतो, पुढे काय? स्थिती चिंताजनक आहे. या विचारांना आव्हान मिळालं नाही, कायदा-सुव्यवस्था राखली गेली नाही, लोकशाही संस्थांच संरक्षण केलं नाही, तर हालात अजून खराब होतील. एक स्वतंत्र आणि लोकशाही व्यवस्था असलेला समाज अशा कट्टरपंथी शक्तींच्या वर्चस्वाखाली विकसित होऊ शकत नाही. बांग्लादेशसमोर आज सर्वात मोठा प्रश्न हा आहे की, या हिंसाचाराला उत्तर कसं द्यायचं.