गौतमीला लागलं FA9LA गाण्याचं वेड, हायवेवरच केला अक्षय खन्नाच्या ट्रेडिंग गाण्यावर भन्नाट डान्स, Viral Video
esakal December 25, 2025 05:45 AM

GAUTAMI PATIL VIRAL VIDEO: सध्या बॉलिवूडमध्ये फक्त आणि फक्त धुरंधरची चर्चा रंगताना पहायला मिळतेय. बॉक्स ऑफिसमध्ये धुरंधर धुमाकूळ घालताना पहायला मिळतोय. या सिनेमाने गेल्या काही दिवसात ७०० कोटीपेक्षा जास्त कमाई केली आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. या सिनेमातील अक्षय खन्नाच्या एन्ट्री सॉन्गने तर प्रेक्षकांना वेड लावलं आहे. या गाण्यातील अक्षय खन्नाच्या डान्स स्टेप्स सोशल मीडियावर चांगल्या व्हायरल होताय. अनेक सेलिब्रिटी या गाण्यावर भन्नाट डान्स करताना पहायला मिळताय. यात लावणी सम्राज्ञी गौतमी पाटील सुद्धा काही मागे नाही.

धुरंधरच्या fa9la गाण्यावर गौतमीनं भन्नाट डान्स केलाय. गौतमीचा डान्सचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गौतमीनं हा व्हिडिओ सातारा हायवेवरील टोलनाक्याजवळ केलाय. भर रस्त्यात गौतमीने केलेल्या डान्सची प्रेक्षकांकडून पसंती मिळताना पहायला मिळतेय. या व्हिडिओमध्ये गौतमी सेम टू सेम अक्षय खन्नासारखे स्टेप्स करतेय.

गौतमीच्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये गौतमीनं जांभळ्या रंगाचा क्रॉप टॉप आणि व्हाईट पॅन्ट घातली होती. डोळ्यावर गॉगल आणि मोकळ्या केसात तिने तिच्या अदा दाखवल्यात. गाण्याच्या शेवटी नेहमीप्रमाणे गौतमीनं तिचे ठुमके सुद्धा लगावलेत. चाहत्यांना गौतमीचा हा भन्नाट डान्स प्रचंड आवडला आहे. सगळीकडे या डान्सच्या व्हिडिओची चर्चा रंगताना पहायला मिळतेय.

View this post on Instagram