सोलापूर : मनसे प्रमुख राजसाहेब ठाकरे आणि शिवसेना ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे एकत्र आल्याची घोषणा बुधवारी (ता. २४) करण्यात आल्यानंतर सोलापुरात मनसैनिक व शिवसैनिकांनी मोठा जल्लोष केला.
Pune News:'ड्रायव्हर काकांच्या मृत्यूने विद्यार्थी हळहळले'; शाळेतील विद्यार्थ्यांना घरी साेडले अन् काय घडलं?दोन्ही भाऊ राजकारणात पुन्हा एकत्र आल्याबद्दल सोन्या मारूती मंदिरत मनसे व शिवसेना ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून व मिठाई वाटप करून जल्लोष साजरा करत मराठी ऐक्याचा विजय साजरा केला.
दोन भाऊ एकत्र येणे म्हणजे मराठी माणसाच्या ऐक्याची वज्रमूठ असल्याची भावना दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत होते. हा एकत्रितपणा महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देईल, असा विश्वास सर्वांनी व्यक्त केला.
आनंदाची बातमी! 'पुणे-सोलापूर रेल्वे प्रवास लवकरच १६० किमी वेगाने'; प्रवाशाच्या वेळेची हाेणार बचत..याप्रसंगी मनसेचे नेते दिलीप धोत्रे, शिवसेना ठाकरे पक्षाच्या उपनेत्या अस्मिता गायकवाड, मनसे जिल्हाप्रमुख विनायक महिंद्रकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी, शहरप्रमुख महेश धाराशिवकर, उपजिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, मनसे लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे, शहराध्यक्ष जैनोद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे, शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके यांच्यासह असंख्य शिवसैनिक व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.