PM Modi Church Visit: ख्रिसमसनिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी दिल्लीतील कॅथेड्रल चर्च ऑफ द रिडेम्पशनमध्ये जाऊन प्रार्थना केली. दिल्ली आणि उत्तर भारतातील वेगवेगळ्या ठिकाणांहून आलेल्या ख्रिश्चन समुदायातील लोकांनी या चर्चेमध्ये हजेरी लावली होती. प्रार्थना सेवेत कॅरेल, भजन आणि इतर ख्रिसमसच्या प्रार्थनांचा समावेश होता. यावेळी दिल्लीचे बिशप rt.rev dr पॉल स्वरुप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी खास प्रार्थना केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावरून ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी काही फोटोही शेअर केले आहेत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, ख्रिसमस नव्या आशा, प्रेम, दयाळुपणाबद्दल कटिबद्धता घेऊन यावी. देशातील जनतेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा दिल्या.
शांती, करुणा आणि आशा या संदेशाचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, येशू मसीहची शिकवण समाजातील एकता, सद्भावना आणखी दृढ करते. जगासह भारतातही ख्रिसमस विविध संस्कृती, परंपरा आणि उत्सवाच्या भावनेसह साजरा केला जातो.
CM Yogi Adityanath: दूरदृष्टीचा नेता आणि कवी मनाचा पंतप्रधान..! अटलजींच्या जन्मशताब्दीनिमित्त CM योगी आदित्यनाथ यांनी सांगितली आठवणकॅथेड्रल चर्चेमध्ये पंतप्रधान मोदी यांनीही प्रार्थना केली. याआधीही पंतप्रधान मोदींनी या चर्चला भेट दिलीय. कॅथेड्रल चर्च हे दिल्लीतल्या सर्वात जुन्या चर्चपैकी एक आहे. हे चर्च दिल्लीतलं सर्वात मोठं चर्च असून त्याच्या स्थापत्यकलेसाठी ओळखलं जातं. दिल्लीतील ख्रिश्चन बांधव ख्रिसमसला सेलिब्रेशनसाठी याच चर्चेमध्ये येतात.