Crocodile Viral Video: मगर चुकीच्या माणसालाच पकडायला आली! पुढे जे घडलं ते पाहून अंगावर काटा येईल
esakal December 26, 2025 09:45 AM

Crocodile Viral Video: सोशल मीडियावर एका मगरीचा आणि एका वृद्ध माणसाचा एक मजेदार व्हिडिओ व्हायरल होत आहे. तो वृद्ध माणूस उद्यानात फिरत असताना अचानक एक मगर त्याच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करते. मगरीचे तोंड उघडे असते, ते खूपच आक्रमक दिसते. परंतू तो माणूस घाबरलेला नाही. त्याच्या हातात आधीच एक फ्राय पॅन होते. मगर जवळ येताच तो त्यावर जोरात हल्ला करतो. हा व्हिडिओ सर्वांनाच विचारात पाडतो की इतक्या धोकादायक प्राण्याचा सामना कसा होऊ शकतो. तसेच या व्हिडिओवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

व्हायरल व्हिडिओ

व्हायरल व्हिडिओ viral_ka_tadaka नावाच्या इंस्टा पेजवर शेअर करण्यात आला आहे. व्हायरल व्हिडिओमध्ये लाल शर्ट घातलेला तो माणूस शांतपणे उभा आहे. मगरीने त्याच्यावर हल्ला करताच, तो मगरीच्या डोक्यावर फ्राईंग पॅनने मारतो. पहिल्या प्रहारापासून मगर मागे जाते,पण तरीही पुढे जाण्याचा प्रयत्न करते. मगर दुसऱ्यांदा आणखी जोरात हल्ला करते आणि तो व्यक्ती परत जोरात हल्ला करतो आणि मगर माघारी जाते. हे इतक्या लवकर घडते की पाहणारेही स्तब्ध होतात. लोक त्याच्या धाडस आणि तयारीबद्दल त्याचे कौतुक करत आहेत.

View this post on Instagram

A post shared by Viral Ka Tadka (@viral_ka_tadka)