Kolhapur Election : आवळे–खंजिरे गटाचा बालेकिल्ला अबाधित राहणार की महायुतीचा निर्णायक घाला? प्रभाग ९ मध्ये थरार
esakal December 26, 2025 09:45 AM

महिला मतदार

८२११

एकूण मतदार

१६,०१३

दृष्टिक्षेपात लोकसंख्या

एकूण लोकसंख्या - १६५०२

अनुसूचित जाती लोकसंख्या - ३६२४

अनुसूचित जमाती लोकसंख्या - ४९पुरुष मतदार

  ७८०२

 कोल्हापूर : कामगार वस्ती, सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीयांचा संमिश्र पट असलेला प्रभाग क्रमांक ९ हा शहरातील राजकीय संघर्षाचा कायमच केंद्रबिंदू राहिला आहे. येथे राजकारण गटांभोवती फिरते आणि गटांची नाती काळानुसार बदलतात.

कालचे कट्टर विरोधक आज एकत्र, तर उद्या आमने-सामने उभे ठाकतात. सभागृहातील गणिते आणि त्या त्या वेळची सत्तासमीकरणे पाहून हातमिळवणी करणाऱ्या या प्रभागात राजकीय संघर्ष अनेकदा टोकाला पोहोचलेला दिसतो. याच पार्श्वभूमीवर यंदाची पहिली महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक ९ साठी सर्वाधिक हायव्होल्टेज ठरणार आहे.
                - ऋषिकेश राऊत

Ichalkarani Election : इच्छुकांची गर्दी आणि अनुभवी मातब्बरांची चुरस; प्रभाग सहामध्ये महायुतीसमोर उमेदवारीचा पेच

या प्रभागात शिव-शाहू विकास आघाडीतील आवळे आणि खंजिरे गटांनी प्रत्येक निवडणुकीत आपले निर्विवाद वर्चस्व राखत बालेकिल्ला उभा केला आहे. स्थानिक प्रश्नांवर पकड, मजबूत संघटन आणि जातीय समीकरणांची अचूक जुळवाजुळव करत या गटांनी या प्रभागावर दीर्घकाळ सत्ता टिकवली.

आता महापालिका निवडणुकीत हे दोन्ही गट पुन्हा एकत्र येत आपला बालेकिल्ला अबाधित ठेवण्याच्या तयारीत आहेत. मात्र, हा बालेकिल्ला हादरवण्यासाठी महायुतीने यंदा आक्रमक पवित्रा घेतला आहे.

Kolhapur Election : कोल्हापूर महापालिकेच्या जागावाटपावर महायुतीत तणाव. मंत्री हसन मुश्रीफ २५ जागांवर ठाम; ३३-३३-१५ फॉर्म्युला अमान्य

अनेक मातब्बर माजी नगरसेवकांसह प्रभावी नवे चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्याची जोरदार तयारी सुरू आहे. आवाडे - हाळवणकर एकत्र आल्याने आणि संघटनात्मक ताकद वाढल्याने अलीकडच्या काळात या प्रभागात भाजपचे स्थान बळकट झाले आहे.

मागील काही वर्षांत या प्रभागात प्रभाव असलेल्या माजी नगरसेवकांना आपल्या गोटात खेचण्यात भाजपला यश आले असून, त्यामुळे महायुतीकडील इच्छुकांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली आहे. भौगोलिक व सामाजिक रचनेच्यादृष्टीने या प्रभागात विविधता आहे.

पूर्वेला मध्यमवर्गीय वस्ती, दक्षिणेला काहीसा उच्च मध्यमवर्गीय भाग, तर पश्चिम आणि दक्षिण बाजूला कामगार वस्ती व झोपडपट्ट्या आहेत. त्यामुळे प्रत्येक निवडणूक जातीय समीकरणे आणि मूलभूत सुविधा असणाऱ्या पाणीपुरवठा, रस्ते, गटार व्यवस्था, स्वच्छता आदी मुद्द्यांभोवती
फिरताना दिसते.

मागील लोकसभा व विधानसभा निवडणुकींत शहरातील इतर प्रभागांच्या तुलनेत प्रभाग क्रमांक ९ मध्ये महायुतीच्या उमेदवाराला फारसे मताधिक्य मिळवता आले नव्हते. त्यामुळे हा प्रभाग अजूनही पूर्णपणे कोणत्याही एका आघाडीच्या बाजूने झुकलेला नसल्याचे स्पष्ट होते.

सध्या दोन्ही आघाड्यांकडून तिकीट मिळविण्यासाठी मातब्बर माजी नगरसेवकांनी प्रभागात जोरदार फील्डिंग लावली असून, अनेक नव्या चेहऱ्यांनीही कंबर कसली आहे. तिकीट वाटपात डावलले गेले तर नाराजी आणि बंडखोरीचा धोका दोन्ही बाजूंना आहे.

महायुतीसाठी ही निवडणूक म्हणजे आवळे - खंजिरे गटाच्या बालेकिल्ल्यावर निर्णायक घाला घालण्याची संधी तर शिव-शाहू आघाडीसाठी हा बालेकिल्ला शाबूत राखण्याची प्रतिष्ठेची लढाई समजली जात आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक नऊमधील ही निवडणूक शहराच्या राजकारणाची दिशा ठरण्याची शक्यता आहे.

प्रभागाची व्याप्ती

लालनगर, हडको वसाहत, नारायणनगर, वेताळपेठ, सुतार मळा, खंजिरे मळा, हॉकी मैदान, नगरपालिका कॉलनी, सरस्वती मार्केट, गांधी कॅम्प, लक्ष्मी मार्केट, अडतपेठ, कॉसमॉस बँक, बरगाले हॉस्पिटल, आवळे मैदान, प्राथमिक आरोग्य केंद्र, नाकोडानगर.

आरक्षण असे...

अ - अनुसूचित जाती 

ब - ओबीसी महिला

क - सर्वसाधारण महिला

ड - सर्वसाधारण

विकासाचे मुद्दे

 भटक्या कुत्र्यांचा उच्छाद

जागोजागी कचरा कोंडाळे, तुंबलेल्या गटारी

वारंवार रस्ते खोदाई आणि दुर्लक्षित डागडुजी

सार्वजनिक शौचालयात स्वच्छतेचा अभाव

पिण्याच्या पाण्यासाठी रोजचा संघर्ष

दृष्टिक्षेपात लोकसंख्या

महिला मतदार = ८२११

एकूण मतदार = १६,०१३

एकूण लोकसंख्या - १६५०२

अनुसूचित जाती लोकसंख्या - ३६२४

अनुसूचित जमाती लोकसंख्या - ४९

पुरुष मतदार = ७८०२

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.